बेस्ट सर्वसामान्य मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनातील वाहतुकीचा असणारा अविभाज्य घटक दररोज हजारो ते लाखो लोक या बेस्ट बसेस ने प्रवास करतात परंतु मागच्या काही दिवसांपासून बेस्ट बसच्या अपघातांचा मालिका आपल्याला बघायला मिळत आहे 2022 ते 2024 पर्यंतच्या काळामध्ये साधारणतः 247 अपघातांची नोंद करण्यात आलेली आहे त्यामुळे सध्याला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा डोकावत आहे.

बेस्ट अपघाताच्या मागील काही घटना पाहता बऱ्याचदा बेस्ट बस विषय विविध प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागतात मागच्या काही काळात जर सगळे बाहेर बसला लागलेली आग तसेच डिव्हायडरला धडकून झालेले एका बसचा अपघात या सर्व गोष्टी पाहता निश्चितच रोशनच्या मनात बऱ्याचदा धाकधूक लागते.
खरं तर सर्वसामान्य मुंबईकरांचा प्रवास सुकर व्हावा या दृष्टिकोनातून या बसेस कडे पाहिलं जातं साधारणतः दर दिवशी मुंबई मुंबई उपनगर मुंबई महानगर तसेच ठाणे विविध परिसरातील साधारणतः 30 ते 35 लाख लोक या बसने प्रवास करतात त्यामुळे निश्चितच वाहतुकीचा हा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे या संदर्भात निर्माण होणारे विविध तक्रारींविषयी प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन याविषयीची पावली उचलावेत असे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.
बेस्ट बस बाबतीत च्या तक्रारी
ई बस विषय सध्याला प्रवाशांच्या बऱ्याचशा तक्रारी या वाढत असताना दिसत आहे खरं तर ईबसची सेवा यामुळे प्रवाशांना सध्याला काहीशा प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे या बस संदर्भात असलेल्या तक्रारींचे निवारण लवकरात लवकर व्हावे असे सामान्य मुंबईकरांचे म्हणणे आहे इ बस विषयी तक्रारी वाढण्याची विविध कारणे ही विविध अभ्यासक सध्याला सांगत आहे खरं तर ई बसला बऱ्याचदा अनेकदा चार्जिंग करावे लागते त्यामुळे बऱ्याचदा चार्जिंग केल्यामुळे त्याचप्रमाणे बसमध्ये असलेल्या बॅटरी या बॅटरी चार्जिंग च्या किंवा विविध कारणांनी तापतात अशा स्थितीत यामुळे बसला आग लागण्याची शक्यता देखील जास्त असते त्यामुळे देखील या बस विषयी तक्रारी सध्याला वाढत आहेत .
बेस्ट बसच्या चालक आणि वाहक यांच्या विषयी देखील काहीशा तक्रारी या मागच्या काही दिवसात वाढलेले आहेत याचे देखील निराकरण करण्याचा आग्रह सर्वसामान्य मुंबईकर करत आहेत खरंतर बस चालवणारे चालक हे प्रशिक्षित आहेत का नाही असा प्रश्न सध्याला सामान्य नागरिक विचारत आहेत .
मागच्याच काही दिवसांपूर्वी झालेला कुर्ला अपघात या अपघातानंतर बेस्ट कडून वाहन चालकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आतापर्यंत साधारणतः सहा जणांच्या तुकडीत 85 चालकांना तीन आठवड्याचे प्रशिक्षण हे बेस्ट कडून देण्यात आलेले आहे या चालकांची प्रशिक्षण पूर्ण करूनच त्यांना सेवेत रुजू करण्यात येणार आहे .
मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात कुर्ला बस अपघात झाला या अपघातामध्ये साधारणतः 20 लोक जखमी झाले तर ती लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला खरंतर या बस अपघातामध्ये बस चालणारा बस स्थानक हा मध्य धुंद अवस्थेत होता असा स्थानिक नागरिकांचा आरोप होता यामुळे या बस्स अपघात झाला असे त्यातले स्थानिक प्रत्यक्षदर्शी सांगतात त्यामुळे निश्चितच बस चालवणाऱ्या चालकांचे प्रशिक्षण झाले का नाही याविषयी देखील सर्वसामान्य नागरिक सध्याला प्रश्न विचारत आहेत .
खरं तर सध्याला मुंबईतील बहुतांश बेस्ट बस या कंत्राटी पद्धतीने कंत्राटदार चालवत आहे परंतु बऱ्याचदा कंत्राट दाराकडून बसच्या दुरुस्तीचे काम तितक्याशा गांभीर्याने होत नाही त्यामुळे अशा स्थितीत बसमध्ये आपल्याला बिघाड बघायला मिळते तसेच या बिघाड नादुरुस्त केल्यामुळे परिणामी बसमध्ये विविध समस्या निर्माण होतात परिणामी बसचा अपघात ,मध्येच बंद पडणे, तसेच बसला आग लागणे अशा गंभीर समस्या देखील बघायला मिळतात त्यामुळे या कंत्राटी पद्धतीवर चालवण्यात येणाऱ्या बस कमी किंवा बंद कराव्यात अशी मागणी देखील सध्याला शहरातील बरेचसे लोक करत आहेत खरंतर स्वमालकीच्या बस गाड्यांची संख्या ही कमी होऊन सध्याला कंत्राटी पद्धतीने चालणारा बसची संख्याही वाढत चाललेली आहे त्यामुळे देखील विविध प्रश्न सध्याला उद्भवत आहेत. त्यामुळे चालू असलेल्या कंत्राटी पद्धतीच्या बस कमी करून सर्वसामान्य नागरिकांना बेफिक्री ने प्रवास करता येईल अशा बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी देखील वाढत आहे .
सध्याला बेस्ट बसच्या ताब्यात देखील बहुतांश गाड्या या नादुरुस्त तसेच बिघाड स्वरूपात आहेत व त्या बंद स्थितीत पडून आहेत अशा स्थितीत या बसची योग्य ती दुरुस्ती करून त्या बस देखील सेवेत आणून नागरिकांच्या प्रवासासाठी त्यांना ते उपलब्ध करून द्याव्यात ज्यायोगे वाढती गर्दी व सध्याला निर्माण होणाऱ्या विविध समस्या यादेखील कमी होण्यास मदत मिळतील असे विविध अभ्यासक सध्याला सांगत आहेत.