नाल्यातून बसलेल्या गाळाची 48 तासात विल्हेवाट लावा बीएमसी आयुक्तांचे आदेश बीएमसी ने मान्सूनपूर्व चालू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी गुरुवारी मुंबईतील विविध ठिकाणी भेट दिल्या वरळीतील नेहरू विज्ञान केंद्र नाला, दादर धारावी नाला, रेस कोर्स नाला या ठिकाणी पावसाळ्यापूर्वी चालू असलेल्या कामांची पाहणी आयुक्तांनी केली.

या पाहणी दौऱ्या दरम्यान नाला उपसातून बाहेर काढलेला गाळ हा 48 तासांच्या आत त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्याचा आदेश आयुक्तांनी दिला तसेच फ्लोटिंग कचरा अर्थात तरंगणाऱ्या कचऱ्यासाठी ट्रॅश बूम च्या व्यवस्थेचे आदेश देखील यावेळी आयुक्तांनी दिले या त्यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान मुख्य अभियंते श्रीधर चौधरी यांच्यासह महानगरपालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते.
बीएमसी कडून शहरातील विविध कामांची पाहणी
शहरात चालू असलेल्या मान्सून पूर्व कामाचे 30 टक्के काम हे सध्या पूर्ण झालेले आहे व उर्वरित काम हे पुढच्या दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणार असल्याचे सांगितलेले आहे पावसाळ्याच्या अगोदर चालू असलेली सर्व कामेही वेळापत्रकाच्या आत पूर्ण करण्याच्या आदेश देखील यावेळी आयुक्तांनी दिले आहेत त्याचप्रमाणे कामाला गती देण्याचा निर्देश देखील दिलेले आहेत.
शहरातील छोट्या तसेच मोठ्या नाल्यातून गाळ काढण्याचे काम हे चालू आहे हा गाळ काढून त्याचे वजन करून त्याची योग्य ठिकाणी वाहतूक करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर निखिल केला जात आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळे निश्चितच कामाच्या आणि वेळेची या दोघांची बचत होण्यास मदत मिळणार आहे व कामात पारदर्शकता निर्माण होण्यास देखील वाव मिळणार आहे.
बऱ्याचदा छोट्या असू किंवा मोठ्या नाल्यांमध्ये ब्लॉकेजेस किंवा नालयांमध्ये अडथळा निर्माण होण्यास प्रामुख्याने तरंगणारा कचरा हेच मुख्य कारण असतं या तरंगणाऱ्या कचऱ्यामध्ये घरगुती तथा विविध गोष्टींनी निर्माण होणारा कचरा म्हणजे प्लास्टिकच्या पिशव्या, थर्माकोल, बॉटल यांसारख्या विविध गोष्टींचा समावेश असतो या सर्व गोष्टींमुळे बऱ्याचदा नाल्यातूनतात प्लास्टिक पिशव्यांसारख्या गोष्टी या नाल्याच्या पाण्यावर तरंगतात परिणामी ब्लॉकेजेस निर्माण करून नाल्यांमधील पाणी रस्त्यांवर येऊन परिणामी विविध समस्या निर्माण होतात अशा स्थितीत प्रत्येक नागरिकांना आपले कर्तव्य व जबाबदारी योग्य राखून घरात निर्माण झालेला कचरा हा नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या डब्यांमध्ये टाकावा प्रशासनाला सहकार्य करावे असे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांनी देखील याविषयी सतर्क राहून घरात निर्माण झालेला कचरा याच योग्य विलेवाट लावावी बीएमसी अर्थात महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या डबे याचा वापर करावा .
तरंगणाऱ्या कचऱ्यासाठी ट्रॅश बुम सारख्या पद्धतीचा वापर करावा असे आयुक्तांनी सांगितले ट्रॅश बुम सारख्या गोष्टीने निश्चितच नाल्यांमध्ये तरंगणाऱ्या कचरा हा बाजूला सारण्यास मदत होते परिणामी नाल्यातील पाण्याचा प्रवाह सुरळीत राहतो.
बऱ्याचदा नाल्यातून उपसलेला गाळ याची योग्य व्यवस्था न केल्याने बऱ्याचदा तो तसाच नाण्यालगतच्या परिसरामध्ये पडून राहतो यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते वाहतुकीच्या समस्या त्याचप्रमाणे या गाळामुळे आरोग्य विषयीचे देखील विविध समस्या जसे की विविध कीटकांचा प्रभाव हा वाढणे त्यांच्या मुळे मच्छर,माशा निर्माण होतात यामुळे विविध समस्या निर्माण होतात अपुरे नियोजनामुळे बऱ्याचदा हा काळ तसाच पडून राहतो परिणामी अवकाळी पावसासारख्या घटनांमुळे बऱ्याचदा हा गाळ पुन्हा पूर्वस्थितीत तथा पूर्व प्रवाहात येऊन नाल्यांमध्ये अडथळा निर्माण करतो त्यामुळेअशा स्थितीत 48 तासांच्या आत या उपसलेल्या गाळाची विल्हेवाट लावण्याचे आदेश देखील यावेळेस देण्यात आलेले आहेत. तसेच कामात पारदर्शकता यावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्याची आदेश देण्यात आलेले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापन तसेच स्वच्छ मुंबई अभियानांतर्गत लोकांमध्ये जनजागृती केली जाते या व्यवस्थापनादरम्यान कचरा विषय असणाऱ्या विविध सूचना देखील नागरिकांना दिल्या जातात.
सध्याला मुंबई शहरात मान्सून पर्वत चालू असणाऱ्या विविध विकास कामांना गती देण्याचे काम महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे शहरात चालू असलेले विविध काँक्रिटीकरणाचे कामे त्याचप्रमाणे नालीसफाईची कामे देखील चालू आहेत मान्सूनपूर्व काळात ही सर्व कामे पूर्ण करण्याच्या आदेश महानगरपालिकेकडून देण्यात येत आहे.
नालेसफाईच्या कामात कुठल्याही प्रकारचा दिरंगाईचा सामना करावा लागू नये यासाठी बीएमसी विविध प्रयत्न करत आहे प्रस्तावित कामाचा वेळोवेळी पाहणी दौरा तसेच प्रत्येक कामाचे अपडेट याविषयीची सर्व माहितीचे नियोजन महानगरपालिका करत आहे मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात नियोजनाच्या अभावी शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची समस्या निर्माण होते वॉटर ब्लॉकेजेशन या समस्यांमुळे जनजीवन विस्कळीत होते अशा स्थितीत यावर्षी पावसाळ्यापूर्वीच सर्व काहीही नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याचप्रमाणे नागरिकांना पावसात कुठलाही त्रास होणार नाही यासंबंधीच्या विविध उपाय योजना आखल्या जात आहेत .