बीएमसी ने कामात दिरंगाई दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर केली कारवाई |BMC takes action against contractors who delay work

बीएमसी ने कामात दिरंगाई दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर केली कारवाई मुंबई शहरात सध्याला विविध ठिकाणी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे काँक्रिटीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शहरातील विविध रस्ते हे नागरिकांच्या वाहतुकीसाठी खुले करावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणात कामाचा आढावा घेत आहे

बीएमसी ने काम तिरंगा केलेल्या ठेकेदार वर केली कारवाई
Image credits – pixabay

बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातच चालू असलेले विविध काँक्रिटीकरणाच्या कामाचा आढावा घेत विविध कठोर पावले उचलली खड्डे मुक्त मुंबई करण्याचे ध्येय गाठण्यासाठी शहरात चालू असलेल्या कामाची योग्य गुणवत्ता राखण्यासाठी बीएमसी ने कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई केली आहे बीएमसी ने रस्त्याच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदाराला दंड देखील ठोठावला आहे.

बीएमसी ने कामात दिरंगाई दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर केली कारवाई

आरे कॉलनी मध्ये दिनकरराव देशमुख रस्त्याच्या काँक्रिटीकरण आणि मास्टिक डांबरीकरणाचे काम चालू आहे या कामाचा आढावा मुंबई अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी केला या तपासणी दरम्यान कमी दर्जाचे काम त्याचबरोबर कामाच्या गुणवत्तेत काहीशा प्रमाणात दिरंगाई झाल्याचे आढळून आल्याने आयुक्तांनी ठेकेदारांना नोटीस पाठवली त्याचप्रमाणे त्वरित काम दुरुस्त करण्याचे आदेश देखील दिले आहे.

शहरातील काही भागातील रस्त्यात स्टॅम्प टेस्टमध्ये त्रुटी आढळल्याने काही प्रकल्पांची नोंदणी देखील रद्द करण्यात आली आहे त्याचप्रमाणे पुढील सहा महिने शहराच्या कोणत्याही कामांमध्ये मिश्रण करण्याची पुरवठा करण्याची मान्यता देखील रद्द करण्यात आलेली आहे तसेच त्या अंतर्गत देखील दोन ठेकेदारांना वीस लाखाचा दंड देखील महानगरपालिकेने लावला आहे .

31 मे 2025 पर्यंत शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे कामाचे पूर्ण नियोजन त्याचप्रमाणे प्रत्येक रस्त्याच्या कामाची पूर्ण होण्याची निश्चित तारीख जाहीर करण्याचे देखील बीएमसीने योजलेली आहे त्याचप्रमाणे रस्त्याच्या कामाच्या प्रत्येक ठिकाणी अभियंत्याने हजर राहावे त्याचप्रमाणे काम कसे चालू आहे कामाची गुणवत्ता योग्य प्रमाणात आहे की नाही तसेच कामात कोणी निष्काळजीपणा करत आहे की नाही याची शहानिशा देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पाहिजे तसेच चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठांनी भेटी देत राहिल पाहिजे व कामात विलंब करणारे ठेकेदानावर कारवाई केलीच पाहिजे असा आदेश बीएमसी आयुक्तांनी दिलेला आहे .

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मागच्याच काही दिवसांपूर्वी शहरात चालू असलेल्या विविध काँक्रिटीकरणाच्या प्रकल्पांना भेट देऊन त्यासंबंधीच्या विविध समस्या जाणून घेतले तसेच दिरंगाई व विलंब करणाऱ्या ठेकेदारांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले त्यांच्या या भेटीदरम्यान राज्याचे मंत्री तसेच मुंबई उपनगराचे सह पालक मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच मुंबईचे आयुक्त भूषण गगराणी अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर उपस्थित होते.

खड्डे मुक्त मुंबई करण्याचे ध्येय लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका मोठ्या प्रमाणात कामाला लागलेले आहे शहरात चालू असलेल्या प्रत्येक कामाचा आढावा त्याचप्रमाणे त्या संबंधित योग्य नियोजन तसेच कामात निकृष्टपणा व निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराला ठेकेदारांवर कारवाई तसेच नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचे ध्येय देखील पूर्ण करण्याचे ठरवलेले आहे .

बृहन्मुंबईच्या पश्चिम उपनगरातील रस्ते कॉंक्रिटीकरण कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यामध्ये, सांताक्रूझ पूर्व येथील श्री अग्रसेन महाराज चौक, जोगेश्वरी पूर्व येथील हनुमान नगर, नटवर नगर, बोरिवली पश्चिम येथील श्री अय्यप्पा मंदिर मार्ग येथील कामांचा समावेश होता.

शहरात चालू असलेल्या बऱ्याचशा कामांसाठी वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे, त्या ठिकाणी एन. ओ. सी. मिळण्या साठी पाठपुरावा करण्याच्या सूचना श्री. बांगर यांनी संबंधितांना दिल्या. जर चालू असलेल्या रस्ते कामात झाडे बाधित होत असल्याचे आढळल्यास रस्त्याचे संरेखन सुधारित करावे आणि झाडे वाचवावीत, असे देखील निर्देश श्री. बांगर यांनी दिले. मुंबई शहरातील रस्ते कामाची गती आणि गुणवत्ता यांचा सुयोग्य ताळमेळ साधावा. तसेच जे रस्ते हाती घेतलेले नाहीत, त्या रस्त्यांवर खड्डे उद्भवणार नाहीत, याची दक्षता बाळगावी, असे श्री. बांगर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना केल्या

कामात निष्काळजीपणा तसेच गुणवत्ता कमी करणारे ठेकेदारांना दंडात्मक कारवाई त्याचप्रमाणे बीएमसीच्या विविध विभागात टेंडर प्रक्रियेत दूर ठेवण्याचा कारवाई देखील यावेळी केली जात आहे त्यामुळे निश्चितच कामाच्या गुणवत्तेमध्ये वाढ होऊन योग्य व चांगल्या प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे .

शहरात चालू असलेल्या विविध काँक्रिटीकरणाच्या कामांना त्या संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेट देऊन कामाची योग्यता व गुणवत्ता तपासली पाहिजे त्याचप्रमाणे त्या संबंधित असणारे अभियंती तसेच ठेकेदार त्याचप्रमाणे काम योग्य प्रमाणात चालली आहे की नाही निषेध इतर काळजी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी तसेच आवश्यकता असल्यास कारवाई देखील करावी असे आदेश पालिकेकडून देण्यात आलेले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top