मुंबईकरांसाठी खुशखबर मध्य रेल्वे 14 एसी लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवणार दर दिवशी हजारो लोक लोकल ने प्रवास करतात सध्या बदलत्या हवामानात उन्हाच्या वाढत्या कडाक्यामुळे अनेक नागरिकांना दररोज या उन्हाळ्यामध्ये प्रवास करावा लागतो अशा स्थितीत प्रवाशांचा प्रवास सुखकर व गारेगार व्हावा यासाठी सेंट्रल लाईन ना 14 वातानुकूलित लोकल ट्रेनची व्यवस्था ही प्रवाशांसाठी केलेली आहे या ट्रेनच्या फेऱ्या जुन्या फेऱ्यांच्या जागी धावणार आहेत त्यामुळे कडकडत्या उन्हात लोकांना एसीचा गारेगार प्रवास चा लाभ मिळेल.

मुंबईकरांसाठी खुशखबर एसी लोकल ट्रेनच्या संख्येत वाढ
सेंट्रल रेल्वेने मुंबई विभागाला सीएसएमटी ते ठाणे आणि मागाठाणे यामध्ये नव्याने 14 एसी लोकल ट्रेनच्या प्रवासाचा प्रस्ताव दिलेला आहे हा प्रस्ताव मुंबई विभागाने मंजूर केला असून 16 एप्रिल पासून या इसी लोकांच्या फेऱ्या निर्धारित वेळेत धावणार आहेत नॉन एसी ट्रेनच्या च्या जागी एसी ट्रेन्स धावल्यामुळे नागरिकांना निश्चितच फायदा होणार आहे.
2023 मध्ये सेंट्रल लाईनच्या एसी फेऱ्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही दोन कोटी नऊ लाख इतकी होती तर 2024 मध्ये मध्य रेल्वे येथे प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या ही दोन कोटी ८४ लाख इतकी होती त्यामुळे निश्चितच या एसी लोकल रेल्वे चा फायदा नागरिकांना होणार आहे
मध्य रेल्वे प्रामुख्याने 1810 उपनगरीय सेवा चालवते त्यात प्रामुख्याने
•मेन लाइन
•हार्बर लाइन
•ट्रान्स हार्बर लाइन
•बेलापूर उरण कॉरिडोर यांचा समावेश होतो .
अप मार्गावरील लोकल फेऱ्या आता एसी लोकल
फेऱ्यांची वेळ | फेरी |
सकाळी ७.३४ | कल्याण-सीएसएमटी |
सकाळी १०.४२ | बदलापूर-सीएसएमटी |
दुपारी १.२८ | ठाणे-सीएसएमटी |
दुपारी ३.३६ | ठाणे-सीएसएमटी |
सायंकाळी ५.४१ | ठाणे-सीएसएमटी |
रात्री ९.४९ | ठाणे-सीएसएमटी |
रात्री ११.०४ | बदलापूर-ठाणे |
डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या
फेऱ्यांची वेळ | फेरी |
पहाटे ६.२६ | विद्याविहार ते कल्याण |
सकाळी ९.०९ | सीएसएमटी ते बदलापूर |
दुपारी १२.२४ | सीएसएमटी ते ठाणे |
दुपारी २.२९ | सीएसएमटी ते ठाणे |
दुपारी ४.३८ | सीएसएमटी ते ठाणे |
सायंकाळी ६.४५ | सीएसएमटी ते ठाणे |
रात्री ९.०८ | सीएसएमटी ते बदलापूर |
या लोकलचे एसी लोकलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे.
सध्या धावणाऱ्या 66 एसी लोकल ट्रेन या 16 एप्रिल पासून यांची संख्या 80 इतक्या वर जाणार आहे लोकल रेल्वे ही तर मुंबईकरांची खरी जीवनवाहिनी आहे दररोज हजारो लाखो लोक या लोकल वाहिनीने प्रवास करतात अशात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते बऱ्याचदा कामाच्या वेळेस गर्दी अतिरिक्त प्रमाणात ओवरकरावीडिंग त्याचप्रमाणे येणाऱ्या विविध तांत्रिक समस्या तसेच हवामानात होणारे विविध बदल जसे की उन्हाळ्यात अति जास्त प्रमाणात उन्हाचा अधिक त्रास यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे प्रवास करतात अशा स्थितीत या एसी फेऱ्यांचा निश्चितच फायदा नागरिकांना होणार आहे.
सध्या राज्यात त्याचप्रमाणे मुंबईत देखील उष्णतेची लाट आहे उष्णतेच्या त्रास हा नागरिकांना दिवसेंदिवस जास्त प्रमाणात जाणवत आहे अशा स्थितीत नॉन एसी ट्रेनची जागा घेतल्यामुळे नागरिकांचा प्रवास हा गारेगार होणार आहे .
पुढील काही दिवस शहराला येलो अलर्ट अर्थात उष्णतेच्या अतिरिक्त सामना करावा लागणार आहे त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी मागील दहा वर्षातील सर्वात उच्च तापमानाची नोंद गेल्या वर्षी शहरात करण्यात आलेले आहे त्यामुळे या वर्षी देखील उन्हाचा वाढता पारा लक्षात घेऊन नागरिकांनी कामाच्या वेळेसच बाहेर पडावे असे आवाहन प्रशासन करत आहे तसेच प्रवास करताना इसी लोकल रेल्वे त्याचबरोबर योग्य ती काळजी व खबरदारी घेऊनच नागरिकांनी प्रवास करावा तसेच काम असेल तरच बाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असे आव्हान देखील विविध आरोग्य सल्लागार करत आहेत तसेच कामानिमित्त बाहेर जाणे झालेच तर प्रवास करताना लोकल रेल्वेच्या चा वेळापत्रकाची पाहणी करूनच करावा ज्यायोगे तांत्रिक समस्या जर निर्माण झाली तर या सूत्रास तुम्हाला यावेळी सहन करावा लागणार नाही तसेच शक्य होईल तितके कोणाचा पारा वाढत जाईल यात आपली कामे करावी असे आवाहन विविध स्तरातून करण्यात येत आहे .
नवीन प्रवाशांना बऱ्याचदा या लोकल रेल्वेमधून प्रवास करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते अशा वेळेस नवीन प्रवाशांनी स्टेशन कोड एक्सचेंज पॉईंट त्याचप्रमाणे विविध समस्या याची अगोदरच खबरदारी घ्यावी त्याचप्रमाणे फ्लॅटफॉर्मवर असणाऱ्या विविध अधिकारी तसेच कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारून देखील आपली गैरसोय कशी टाळता येईल याची काळजी घ्यावी कारण बऱ्याचदा पीक अवर्स मध्ये मोठ्या प्रमाणात प्रवास करणाऱ्यांची संख्या असते त्यामुळे नवीन प्रवाशांचे गोंधळ बऱ्याचदा या वेळेस बघायला मिळतो . अशा गोंधळाच्या स्थितीत बऱ्याचदा प्लॅटफॉर्मर असणाऱ्या अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचारी तुमची मदत करतात व त्यांची मदत तुम्ही घेतली पाहिजे .