माहुल भागातील घरांना नागरिकांचा अत्यल्प असा प्रतिसाद दिसत आहे साधारणतः नऊ हजार घरे बांधून तयार असून या घरांना नागरिकांचा अत्यल्प असा प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई महानगरपालिकेचे पूर्व उपनगरातील माहुल भागात प्रकल्प बाधितांसाठी घरे बांधण्यासाठी निर्णय हा घेण्यात आलेला होता त्यानुसार या भागात घरी देखील बांधण्यात आलेली आहे परंतु या भागातील बहुतांश घरही सध्याला रिकामी आहेत ही घरे स्वस्तात व परवडणाऱ्या किमतीमध्ये बनवण्यात आलेली आहे परंतु ही घरे सध्याला रिकामीच आहेत साधारणतः 9000 इतकी घरे असून या घरांसाठी केवळ 330 इतकेच अर्ज सध्याला महापालिकेकडे आलेले आहेत त्यातही केवळ 53 अर्जदारांनीच घरासाठी लागणारी रक्कम ही भरलेली आहे.
माहुल भागातील घरांना नागरिकांचा अत्यल्प असा प्रतिसाद
मुंबई उपनगरातील माहुल भागात बांधण्यात आलेल्या या घरांच्या देखभाल हे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे केले जाते साधारणतः 13000 घरे ही या अंतर्गत या भागात प्रकल्प बाधितांसाठी बांधण्यात येणार होती त्यातील नऊ हजार घरे ही बांधून तयार झालेली आहेत ही घरे तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांसाठी सध्याला उपलब्ध करण्यात आलेली आहे परंतु या घरांप्रती नागरिकांनी म्हनावा तितकासा प्रतिसाद दाखवलेला नाही .
माहुल मधील प्रकल्प बाधितांसाठी बांधण्यात आलेल्या एका घराची किंमत ही 12 लाख 60 हजार इतक्या आहेत तर दोन घरांची किंमत ही 25 लाख 20 हजार इतकी आहे या घरांच्या एकंदरीत प्रक्रियेसाठी महानगरपालिकेच्या बँकेकडून 8.50 ते टक्के इतक्या दराने 90% इतकी कर्जही सध्या उपलब्ध करून दिले जात आहे या संबंधित घरांसाठी करण्यात येणाऱ्या अर्जांसाठी मुदतवाढ देखील करण्यात आलेली होती परंतु मुदतवाढ करून देखील अर्जांच्या संख्येमध्ये म्हणावी किती वाढ ही झालेली नाही ईव्हर स्माईल पीएपी संकुल माहुल आंबापाडा आणिक गाव येथे सनदीका तत्वावर घरेही देण्यात येणार आहेत.
या घरांच्या विक्रीसाठी महापालिकेने खूप सारे प्रयत्न देखील केले त्यांच्या निकषांमध्ये शितलता देखील आणली तसेच अर्जाच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ देखील करण्यात आली परंतु दोन महिन्यात केवळ 330 अर्ज आली त्यातही 195 जणांनी ही घरे नाकारली तसेच ज्या 53 अर्जदारांनी 72 घरांची रक्कम भरली त्यांनाच केवळ या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या या घरांचा ताबा देण्यात आला त्यामुळे या प्रकल्पामध्ये बहुतांश घरी सध्याला रिकामी बघायला मिळत आहे या संपूर्ण माहुल भागातील बांधण्यात आलेल्या या घरांचा देखभालीचा खर्चही मुंबई महानगरपालिका बघते वर्षाला साधारणतः सात कोटी इतका खर्च या घरांच्या देखभालीसाठी येतोअर्ज केलेल्या अर्जदारांसाठी 21 जून रोजी या घरांची सोडत हे निघणार होती परंतु त्यातील 195 जणांनी या प्रक्रियेला नकार दिला परिणामी 31 जून पर्यंत या घरांच्या वाटप करण्याचा निर्णय हा घेतला आणि केवळ 53 लोकांनीच त्यांच्या भरलेल्या अनामित रकमेमध्ये त्यांना या घरांचा ताबा मिळालेला आहे .
देखभालीसाठी येणारा हा खर्च महानगरपालिकेला परवडणारा नाही त्यामुळे या घरांची विक्री ही लवकरात लवकर करण्यासाठी त्याला महापालिका विशेष असे प्रयत्न करत आहे मागच्याच काही काळामध्ये ही घरे विकण्यासाठी त्यांचे नियमांमध्ये शिथीलता ही देखील आणण्यात आली महापालिकेतील निवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच अन्य कर्मचाऱ्यांना व शिक्षकांना देखील ही घरे देता येईल का काय यासंबंधीचा विचार देखील सध्याला महानगरपालिका ही करत आहे.
माहुल भागात बांधण्यात आलेली ही घरे खरंतर स्वस्त किमतीचे आहेत तर तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कामगारांसाठी या घरांची विशेष अशी व्यवस्था ही करण्यात आलेली आहे परंतु याला नागरिकांनी तितकासा असा प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे ही घरे सध्याला तशीच रिकामी आहेत खरं तर मुंबई शहरातील पूर्व उपनगरातील भागात ही घरे बांधण्यात आलेली आहे तरी देखील या घरांना म्हणावा तितकासा प्रतिसाद हा मिळत नाही यामुळे या घरांच्या देखभाली साखरच ही महानगरपालिका सध्याला करत आहे परंतु विक्री अभावी कुठल्याही उत्पन्नाचा स्त्रोत यामुळे सध्याला महापालिकेला उपलब्ध नाही त्यामुळे या घराच्या देखभालीचा अतिरिक्त बोजा हा सध्याला महापालिकेवर पडत आहे त्यामुळे ही घरे लवकरात लवकर कशी विकतील या संदर्भातील विविध गोष्टींचा विचार सध्याला महापालिका करत आहे.
खरंतर मुंबईसारख्या शहरांमध्ये घर असण हे प्रत्येकाचा स्वप्न असतं परंतु मुंबई शहरातील पूर्व उपनगरातील माहुल सारख्या भागामध्ये घरांना मिळालेला हा अत्यल्प प्रतिसाद हा त्यामानाने आश्चर्यकारक मानला जात आहे त्यामुळे लवकरात लवकर या घरांच्या विक्रीसाठी विशेष असे प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेले आहे महापालिकेद्वारे अन्य घटकांचा देखील या घरांच्या विक्रीसाठी विचार केला जाऊ शकतो.
