ताडदेव परिसरातील केलेल्या बांधकाम पाळीच्या कारवाईवर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या तोंडी आश्वासनानंतर देखील या भागातील बांधकामावर कारवाई करण्यात आली.

ताडदेव पुनर्विकास प्रकल्पात कायमस्वरूपी पर्यायी निवासस्थानासाठी पात्र करण्याच्या यादीत आपला समावेश करावा ही मागणी याचिका करते सागर नार्वेकर यांनी न्यायालयात केलेली होती त्या संदर्भात सुनावणी देखील चालू होती त्या सदरम्यान न्यायालयाने या संबंधित प्रकरणातील कारवाईवर तोंडी आश्वासन हे दिलेले होते परंतु तोंडी आश्वासन देऊन देखील दुसऱ्याच्या दिवशी याचिका कर्त्याच्या घरावर पाडकामाची कारवाई करण्यात आली .
ताडदेव परिसरातील याचिकाकर्त्याच्या घरावर करण्यात आलेली ही कारवाई यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केलेली आहे महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे सदर याचिका करता रस्त्यावर आल्याचे यावेळी न्यायालयाने नमूद केले संबंधित प्रकरण हे न्यायमूर्ती बर्गिस कुलाबावला आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आले तसेच या संबंधित कारणे दाखवा ही नोटीस देखील यावेळेस न्यायालयाने संबंधित प्रकल्पातील अधिकाऱ्यांना दिलेली आहे.
ताडदेव सारखा परिसर खरंतर दक्षिण मुंबईतील एक उच्चभ्रू मानला जातो या परिसरात मध्यमवर्गीयांपासून ते उच्चवर्गीय लोक राहतात त्याचप्रमाणे या भागात जुन्या इमारतींबरोबर देखील मोठ्या गगनचुंबी अशा उंच इमारती आहेत त्यामुळे हा परिसर देखील खूप महत्त्वाचा आहे शहरातील विविध महत्त्वाचे ठिकाणे या भागाच्या आसपास आहेत या परिसराच्या आसपास हाजी अली, मलाबार हिल, ग्रँड रोड यांसारखी विविध ठिकाणी येतात त्यामुळे ठिकाणांच्या दृष्टीने देखील हा भाग महत्त्वाचा आहे.
ताडदेव येथील कारवाईवर न्यायालयाने केली नाराजी व्यक्त
या कारवाईवर स्पष्टीकरण देताना महानगरपालिकेने या कारवाईदरम्यान बाधित झालेल्या या पिढीतला भायखळा येथील संक्रमण शिबिरात खुली दिली आहे असे स्पष्ट केलेले आहे परंतु न्यायालयाचे आदेश असताना देखील यासंदर्भात कारवाई केल्याने न्यायालयाने याची गंभीर दखल ही सध्याला घेतलेली आहे कोणालाही न जुमानत केलेली ही कारवाई यामुळे याचिकाकर्त्याची घर हे उध्वस्त झाले परिणामी त्याला रस्त्यावर यावे लागले यासंदर्भात न्यायालयाने महानगरपालिकेचे अधिकारी वैभव मस्करे आणि सचिन प्रकाश महाजन यांच्यावर अवमान कारक कारवाईच्या ठपका ठेवत कारवाई केलेली आहे तसेच हा संबंधित याचिका करता जर पात्र झाल्यास त्याला एक सजनी कार्यक्रमात ठेवावी असे आदेश देखील या वेळेस विकासकाला देण्यात आलेले आहेत .
याचिका करते सागर नार्वेकर यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमध्ये 2018 मध्ये प्रसिद्ध केलेले सुधारित इरादा पत्र रद्द करण्याची मागणी देखील केलेली आहे तसेच या पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत कायमस्वरूपी पर्यायी निवास स्थानासाठी पात्र करणाऱ्या यादीत आपले नाव समाविष्ट करावे अशी देखील याचिका त्यांनी या दाखल केलेली आहे महानगरपालिकेने केलेल्या या कारवाईमध्ये न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला त्यांच्या या कारवाईबद्दल कारणे दाखवा नोटीस देखील जारी केलेली आहे तसेच या संपूर्ण प्रकरणावर बोलताना न्यायालयाने न्यायालयाचा अवमान झाल्याची कारवाई का करू नये अशी विचारणा देखील केलेली आहे कारण या प्रकरणात न्यायालयाने दिलेले तोंडी आश्वासन याला न जुमानता महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केलेली आहे. खरंतर या संपूर्ण प्रकरणात याचिका करता सागर नार्वेकर याची भूमिका ऐकत या संबंधित प्रकरणात न्यायालयाने त्याला काहीसा दिलासा दिला होता. त्याच्या घरावर कुठली कारवाई करू नये असा आदेश देखील दिलेला होता
न्यायमूर्ती बर्गीस कुलाबावला आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनावाला यांच्या खंडपीठांसमोर या संबंधित प्रकरणाची सुनावणी सुरू होती त्यामुळे या संबंधित प्रकरणात झालेल्या या कारवाईची सध्याला न्यायालयाने गंभीर दखल ही घेतलेली आहे खरं तर या संपूर्ण कारवाई मध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाला पूर्णतः दुर्लक्ष करत ही कारवाई केलेली आहे . महानगरपालिकेचे अधिकारी वैभव मस्करे आणि सचिन प्रकाश महाजन यांनी या संदर्भातील पाडकामाची कारवाई ही केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर देखील न्यायालयाच्या अवामानाची कारवाई करण्यात येणार आहे.
मुंबई शहरात सध्याला विविध ठिकाणी धोकादायक इमारती या पुनर्विकसित करण्याची प्रक्रिया चालू आहे शहरातील विविध इमारतीची या अंतर्गत पुनर्विकसित केल्या जात आहेत ताडदेव सारखा हा दक्षिण मुंबईतील उच्च गृह परिसर तसेच या परिसरातील देखील धोकादायक इमारतींचा पुनर्विकसनाची कामेही सध्याला सुरू आहेत त्या अंतर्गतच या भागातील काही ठिकाणांमध्ये महानगरपालिकेने काम देखील सुरू केलेले आहे. शहरात सध्याला विविध ठिकाणी पुनर्विकास प्रकल्प हे चालू आहेत शहरातील वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या इमारतींच्या पुनर्विकासनाची व त्यांच्या पुनर्विकसित बांधकामांची कामही चालू आहेत ताडदेव परिसरातील या भागात देखील विविध इमारतींची कामे सध्याला चालू आहेत महानगरपालिकेच्या या कारवाईदरम्यान सुनावणीच्या अवघ्या दुसऱ्याच दिवशी महानगरपालिकेने त्याच्या घरावर कारवाई केली त्यामुळे त्याच्या राहण्याचा प्रश्न हा निर्माण झाला त्यामुळे संबंधित याचिका कर्त्याला सध्याला भायखळा येथील संक्रमण शिबिरात खोली देण्यासाठी ठरवलेले आहे .