मुंबईतील प्रभादेवी पुलाचे पाडकाम लांबणीवर 125 वर्ष जुना असलेला हा पूल सध्याला अटल सेतूला जलद गतीने जाता यावे यासाठी थेट वांद्रे वरळी सी लिंक रोडला जोडण्यासाठी शिवडी वरळी उन्नत मार्गीकेसाठी या पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे या पुलाचे पाडकाम करून त्यावर नवीन दुहेरी डबल डेकर पूल बांधण्याचे काम करण्यात येणार आहे .

या पुलाच्या पाडकामासाठी तसेच पर्यायी वाहतुकी मार्गीतेचा विचार करण्यासाठी तसेच पूल बंद करून नवीन उभारणीसाठी वाहतूक पोलिसांनी सूचना हरकती मागवल्या होत्या साधारणता सात एप्रिल ते 13 एप्रिलच्या दरम्यान या हरकती सूचना मागवल्या गेल्या होत्या यादरम्यान मोठ्या प्रमाणात सूचना हरकती सूचना प्राप्त झाल्या त्यानंतर अंतिम निर्णय घेऊन चार ते पाच दिवसात घोषित करण्यात येणार असल्याचे सांगितलेले आहे .
प्रभादेवी पुल
प्रभादेवी पुलाच्या पाडकामामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे हा पूल 125 वर्ष जुना असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते या पुलाचे पाडकाम करून त्यावर नवीन दुहेरी फुल बांधण्याचे काम एमएमआरडीएने हाती घेतलेले आहे त्यासंबंधीची परवानगी त्यांनी वाहतूक पोलिसांना मागितली होती त्यानुसार 15 एप्रिल 2025 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत च्या काळामध्ये हा पूल पाडकामादरम्यान बंद राहणार आहे या काळात वाहतूक ची कोंडी टाळण्यासाठी विविध पर्याय मार्गांचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे
प्रभादेवी पुलाच्या पाडकामा दरम्यान दरम्यान पर्यायी वाहतुकीचा काही मार्गांचा विचार खालील प्रमाणे करण्यात आला आहे
•पुलाचा पूर्वेकडील मार्ग बंद केल्याने प्रभादेवी पुलामार्गे परेल भागाकडे जाणारी वाहने संत रोहिदास चौक येथून सरळ वडाचा नाका जंक्शन येथून लोअर परेल पूलमार्गे भारत माता जंक्शन येथून जातील.
•सायन, माटुंगाकडे जाणारी वाहने सेनापती बापट मार्गावरून डावीकडे जाऊन व्ही. एस. मटकर मार्ग व बाबूराव परुळेकर मार्ग टिळक पुलामार्गे खोदादाद सर्कल येथून जातील.
•प्रभादेवी व वरळीकडे जाणारी वाहने मडके बुवा चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने भारत माता जंक्शनवरून उजवीकडून जातील.
•दादर पश्चिमेकडे जाणारी वाहने मडके बुवा चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने टिळक पुला मार्गे जातील.
प्रभादेवी पुलाच्या पाडकामादरम्यान घेतला जाणारा मेगाब्लॉक
या कामादरम्यान मध्ये आणि पश्चिम रेल्वेवर काही काळांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे हा मेगाब्लॉक किती वेळ व किती काळापर्यंतचा असेल ठीक आहे दिवसांनी स्पष्ट करण्यात येणार आहे . तसेच या भागात असणाऱ्या पादचारी पुलाचा देखील नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे पादचारी रस्त्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या लोकांना देखील असे त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे .
125 वर्षाचा असलेला असलेला हा पूल नव्या स्वरूपात निर्माण होणार आहे नवीन उभारणीचा हा पूल 27 मीटर उंच 132 मीटर लांबीचा असणार आहे तसेच परळ आणि वरळी या दोन्ही भागांसाठी जोडा रस्ता देखील असणार आहे तसेच पादचारी फुलाचे देखील काम यातच करणारी येणार आहे यासाठी साधारणतः 168 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित केला गेलेला आहे .
या पुलाच्या पाडकामासाठी तसेच नवीन उभारण्यासाठी हरकती सूचना मोठ्या प्रमाणात आल्याचे दिसून येत आहे या हरकती सूचनांवर विचार करून निर्णय घेण्यास काही दिवसांचा अवधी निश्चितच लागणार आहे कारण प्रचंड प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असलेला हा भाग पुढील काही काळासाठी अर्थात जवळपास दोन वर्षांसाठी बंद राहणार आहे त्यामुळे पर्यायी मार्गिकेचा वापर लोकांना त्यांच्या सोयीनुसार व कुठलीही वाहतूक कोंडी न होता करण्यासाठी विविध प्रयत्न शासन करत आहे खरं तर वीस महिन्याच्या दरम्यान हा पूल बंद राहणार आहे त्यामुळे प्रदीर्घकाळात कुठलीही वाहतूक कोंडीचा सामनागरिकांना करावा लागणार नाही ज्यायोगे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्हीही यांचे बचत कशी होईल यासाठी विविध अभ्यास एक सध्याला पर्यायी मार्गिकेचा वापर कसा करता येईल यासाठी कार्यरत आहेत .
या फुलाचे बांधणी पूर्ण झाल्यानंतर 156 m चा जोडा रस्ता परळ साठी तर 209 मीटरचा जोडा रस्ता वरळी साठी बांधणार येणार आहे त्याचप्रमाणे स्थानकाजवळ असलेला पादचारी फुल देखील नव्याने बांधण्यात येणार असल्यामुळे निश्चितच याचा फायदा हा नागरिकांना होणार आहे खर तर हा फुल खूप जुना आहे त्यामुळे नव्याने बांधण्यात येणाऱ्या फुलामुळे निश्चितच वाहतूक अतिशय जलद आणि सुसाट होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे . सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात विविध प्रकल्प ही चालू आहेत निश्चितच या प्रकल्पांची पूर्तता झाल्यावर मुंबईचे रुपडे निश्चितच बदलणार आहे त्यातच महत्त्वाचा असलेला हा टप्पा देखील पूर्ण झाल्यानंतर निश्चितच याचा फायदा मुंबईकरांना होणार आहे . .