मुंबईकरांच्या पाण्यासाठी गारगाई धरण प्रकल्पाला फडणवीसांकडून मंजुरी |Fadnavis approves Gargai Dam project

मुंबईकरांच्या पाण्यासाठी गारगाई धरण प्रकल्पाला फडणवीसन कडून मंजुरीमुंबईच्या वाढत्या लोकसंख्येबरोबरच सामान्य मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गारगाई धरण प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे त्यानुसार वन्यजीव आणि पर्यावरणीय अटीपाळत प्रकल्पाला पुढे नेण्याचे योजले आहे .

गारगाई धरण प्रकल्पाला फडणवीसंकडून मंजुरी
Image credits – pixabay

गारगाई प्रकल्प हा खरं तर 2012 पासून प्रस्तावित होता परंतु 2018 पर्यंत या प्रकल्पावर कुठलीही कारवाई करण्यात आली नव्हती बृहन्मुंबई महानगरपालिका बीएमसी तसेच राज्य शासनाच्या पुढाकाराने सध्याला या प्रकल्पाला गती देण्याचे काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आखले आहे या अंतर्गतच 844 हेक्टर जमीन जमिनीच्या वळतीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची तहान भागण्यास निश्चितच मदत होणार आहे .

हा प्रकल्प मुंबईच्या उत्तरेला पालघर जिल्ह्यातील वाडा येथे प्रस्तावित आहे त्यासाठी सुमारे 5000 कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज आहे त्यामुळे मुंबईकरांना जी पाण्याची कमतरता भासते ही कमतरता पूर्ण करण्यासाठी हे धरण निश्चितच मदत करेल साधारणतः मुंबईकरांना चार हजार पाचशे पन्नास भासते परंतु सध्या उपलब्ध असलेल्या धरण साठ्यानुसार सहाशे ते साडेसहाशे दशलक्ष लिटर पाण्याची कमतरता ही नेहमीच भासते त्यामुळे या धरण प्रकल्पाच्या कामानंतर पाण्याचेही कमतरता भरून निघून सर्वसामान्य मुंबईकरांना निश्चितच पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही असे विविध अभ्यासक सांगत आहेत .

गारगाई धरण प्रकल्पाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मंजुरी

मुंबई येथे राज्य वन्यजीव मंडळाची 24 वी बैठक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर, मुख्य सचिव तसेच वन्यविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी, वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद महिस्कर, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, प्रिन्सिपल चीफ कन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट्स (फॉरेस्ट फोर्स) शोमिता बिस्वास आणि प्रिन्सिपल चीफ कन्झर्व्हेटर ऑफ फॉरेस्ट्स (वन्यजीव) श्रीनिवास राव हे देखील त्यावेळी बैठकीला उपस्थित होते .

या बैठकीत गार गाई प्रकल्पासाठी आवश्यक असणारे वन्यजीव व पर्यावरणीय विषयक असणाऱ्या सहमती या देण्यात आल्या. तसेच केंद्र सरकारच्या परिवेष पोर्टलवरील नकाशा प्रमाण मानून व्याघ्र भ्रमंती मार्ग निश्चित करणे आणि या मार्गावरील खासगी जमिनी शेतकऱ्यांच्या स्वेच्छेने संपादित करण्याचा निर्णय घेण्यात आला. व त्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गारगाई धरण प्रकल्प मुंबईसाठी महत्त्वाचा असून वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी तसेच सर्वसामान्य मुंबईकरांची पाण्याची तहान पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी 844.879 हेक्टर जमिनीच्या वळतीकरण प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे. वन विभागाने संबंधित परवाने अटींच्या अधीन राहून तत्काळ मंजूर करावेत तसेच राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे त्रुटीविरहीत प्रस्ताव सादर करून प्रकल्पास मंजुरी मिळवावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

या प्रकल्पासंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा करतानाव्याघ्र भ्रमंती मार्गावरील खासगी जमिनी सहमतीने संपादित करून, वनीकरणासाठी वापरण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला. तसेच चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जनाईवाडी येथील वन संपादनाचे शेरे कमी करणे आणि जायकवाडी पक्षी अभयारण्यामध्ये तरंगत्या सौर प्रकल्पास मान्यता देण्यासह इतर महत्त्वाच्या प्रस्तावांनाही बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली.

राज्याच्या वन्य विभागाकडून या प्रकल्पाचा प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्यात येणार आहे व त्या अनुरूप लागणाऱ्या विविध परवानग्या व तपशील मिळणार आहे . खरंतर मुंबईला पाणीपुरवठा करणारे साथ धरण आहे त्यामध्ये प्रामुख्याने वैतरणा, मोडक, तानसाम, मध्यवैतरणा, भातसाम, विहार, तुळशी ही धरणे आहेत या धरणातील पाण्याद्वारे शहरातील सामान्य नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात काहीशा प्रमाणात पाण्याची टंचाई निर्माण होते त्यामुळे बऱ्याचदा पाणीटंचाईच्या या संकटाला सामोरे जावे लागते अशा स्थितीत ही निर्माण झालेली पाण्याची टंचाई घारगाई धरण प्रकल्पामुळे निश्चितच भरून निघण्यास मदत होणार आहे .

मुंबईच्या उत्तरेकडील भागात पालघर येथील वाडा येथे हा प्रकल्प करण्याचे योजिले आहे त्यामुळे मुंबई महानगर मुंबई उपनगरातील लोकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे मागच्याच काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये टँकर असोसिएशनच्या संपामुळे नागरिकांना काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागला त्यामुळे यासारख्या प्रकल्पामुळे पाण्यासंबंधीच्या विविध समस्या निश्चितच कमी होणार आहे असा विश्वास विविध अभ्यासक व्यक्त करत आहे. मुंबई शहराला सध्याला सात धरणाद्वारे पाणीपुरवठा केला जातो अशातच प्रस्तावित असलेल्या या धारण प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळे यामध्ये भर पडून पाण्याच्या असलेली कमतरता दूर होऊन पाणीपुरवठा संबंधीची कमतरता भरून निघण्यास निश्चितच मदत होणार आहे . व सर्व सामान्य नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top