खंडोबा टेकडी घाटकोपर येथील प्रस्तावित कारशेड हलवण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर केली.

खंडोबा टेकडी घाटकोपर येथील करशेड प्रकरण वादात
खंडोबा टेकडी घाटकोपर येथे प्रस्तावित असलेल्या कारशेड मुळे त्या परिसरातील बारा हजार झाडे कापली जाणार असल्याने हा कारशेड इतरत्र हलवावा अशी मागणी तिथल्या स्थानिक नागरिकांनी केलेली आहे यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घेऊन त्या संदर्भात निर्णय घेण्याची विनंती देखील केलेली आहे.
खंडोबा टेकडी घाटकोपर परिसरात मेट्रो लाईनच्या कामासाठी कारशेड उभारण्यात येणार आहे खरंतर हे कारशेड सुरुवातीला राई मुर्दा येथे होते परंतु या भागातील ते हलवून ते खंडोबा टेकडी घाटकोपर येथे नेले तसेच या परिसराततील जागेला राज्य सरकारकडून देखील मान्यता मिळाली तसेच ही जागा एमएमआरडी अर्थात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत असल्यामुळे जागा देखील सहज उपलब्ध झाली परंतु या कारशेड मुळे त्या परिसरातील बारा हजार झाडे ही कापली जाणार आहेत.
खंडोबा टेकडी घाटकोपर परिसरातील या कारशेड मुळे इतक्या मोठ्या प्रमाणात झाडांची होणारी ही कत्तल यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होणार आहे त्यामुळे या संदर्भात स्थानिक नागरिकांनी या कारखेडला विरोधाची भूमिका दाखवलेली आहे तसेच त्या संदर्भात जन आंदोलन देखील नागरिकांनी उभा केलेले आहे मागच्याच आठवड्यात या झाडांच्या सुरक्षिततेसाठी व सुरक्षासाठी मानवी साखळी आंदोलन देखील नागरिकांकडून करण्यात आले यावेळी या आंदोलनात या परिसरातील साधारणतः 7000 नागरिकांचा समावेश होता इतक्या मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांचा विरोध या करशेडला आहे.
खंडोबा टेकडी घाटकोपर येथील या प्रस्तावित कारशेड साठी वृक्षतोड करण्यासंदर्भात जन सुनावणीचा शासन निर्णय जारी नसताना देखील कंत्राटदाराच्या माध्यमातून या भागातील वृक्षतोड अर्थात झाडांची तोडणी सुरू केलेली आहे त्यामुळे क्रमांक नसलेली झाडे तोडली जात आहेत तसेच या प्रकरणात नागरिकांची दिशाभूल देखील केली जात आहे व या भागात बेकायदा काम देखील सुरू करण्यात आलेले आहे त्यामुळे ही सर्व कामे रद्द करण्याची मागणी यावेळी केलेली आहे.
एम एम आर डी ए म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या दहिसर मीरा-भाईंदर मेट्रो नाईन च्या कामासाठी या खंडोबा टेकडी घाटकोपर परिसरात कारखेड उभारण्यात येणार आहे मेट्रो नाईन चे वाहतूक जलद गतीने होण्यासाठी या भागात कार्यशाळे उभारण्यात येणार आहे.
मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या कारशेडमुळे अगोदर देखील मोठ्या प्रमाणात वाद हा निर्माण झालेला आहे आरे परिसरातील कार शेड तसेच कांजूरमार्ग परिसर मगरपाडा परिसरातील कार शेड यांचा वाद अजूनही मिटलेला नाही त्यातच खंडोबा टेकडीच्या या प्रस्तावित परिसरातील प्रकरणामुळे नवीन वाद हा निर्माण झालेला आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाला या सर्व गोष्टींचा विचार करूनच पुढे कारवाई करावी लागणार आहे.
दरम्यान या प्रकरणात नागरिकांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात लक्ष घालण्याची विनंती देखील केलेली आहे तसेच अजित दादांनी देखील या संपूर्ण प्रकरणाची महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून या संदर्भातील मागणीवर तोडगा काढण्याची आश्वासन त्यांनी नागरिकांना दिलेली आहे खरं तर मुंबई शहरात सध्याला मोठ्या प्रमाणात मेट्रोची कामे ही सुरू आहेत तसेच रस्त्याच्या विविध काँक्रिटीकरणाचे देखील काम सध्याला शहरात सुरू आहे त्यामुळे बऱ्याचदा या बांधकामाच्या दरम्यान येणाऱ्या झाडांना बऱ्याचदा यामुळे वृक्षतोडीची समस्या जाणवत आहे झाडांची होणारी ही वृक्षतोड टाळण्यासाठी देखील नागरिक मोठ्या प्रमाणात सध्याला प्रयत्न करत आहेत कारण बऱ्याचदा शहरात विविध ठिकाणी असलेली झाडे ही जुनी आहेत त्यामुळे केवळ विकासाच्या नावाखाली या झाडांची तोडणी केली जात आहे असे आरोप बऱ्याचदा नागरिकांकडून केला जात आहे त्यामुळे या झाडांचे संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक सध्याला पुढे सरसावलेले आहेत.
खंडोबा टेकडी घाटकोपर परिसरातील या प्रस्तावित कार शेडमुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोडली जाणार आहेत त्यामुळे नागरिकांनी देखील या विरोधात तीव्र अशी भूमिका घेतलेली आहे तसेच ही वृक्षतोड रद्द करण्याची मागणी देखील केलेली आहे हे प्रकरण तसेच प्रलंबित राहिल्यामुळे शहरातील काहीशी कामे सध्याला खोळंबलेली आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढत प्रशासनाला मेट्रोचे काम पूर्ण करून घ्यावयाची आहे कारण शहरातील वाहतुकीमध्ये मेट्रोचे महत्त्व अनन्यसाधारण आहे मुंबई शहरातील वाढत्या लोकसंख्येला परिपूर्ण असे परिवहन व त्यांच्या वाहतुकीसाठी विविध गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी शासन हे नेहमीच प्रयत्नशील असते लोकल ट्रेन बेस्ट बसेस त्याचप्रमाणे मेट्रो यादेखील यातच येतात.
