मेट्रो लाईन 9 च्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण झाली या पहिल्या टप्प्यात दहिसर मीरा भाईंदर मार्गिकेतील साडेचार किलोमीटर मार्गेगेची चाचणी पूर्ण झाली या चाचणी सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

मिरा भाईंदरच्या या पहिल्या चाचणी टप्प्यात चार स्थानकांचा समावेश केला गेलेला होता यात दहिसर पूर्व,पांडुरंग वाडी, मिरगाव व काशिगाव या स्थानकांचा समावेश होता तर दुसरा टप्पा साईबाबा नगर, मेडीतिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन व सुभाषचंद्र बोस स्टेडियम या स्थानकांचा समावेश केला गेलेला आहे 13.6 किलोमीटरच्या या टप्प्यात तील मार्गिकेतील पहिला टप्पा हा साडेचार किलोमीटर इतका होता.
मेट्रो लाईन 9 च्या पहिल्या टप्प्याची चाचणी पूर्ण
या मेट्रो लाईन लाईन मुळे मीरा-भाईंदरला मुंबई शहरातील विविध भागातील कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार आहे मीरा-भाईंदरला पूर्व उपनगर त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच मुंबईच्या पश्चिम भागाशी देखील कनेक्टिव्हिटी मिळणार आहे तसेच डबल डेकर मेट्रो फ्लायोवर असलेला हा प्रकल्प सामान्य मुंबईकरांची वाहतूक कोंडी ही मोठ्या प्रमाणात दूर करणार आहे या सोहळा दरम्यान महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2027 पर्यंत मेट्रो लाईनची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे आशा व्यक्त केलेली आहे.
या सोहळ्याला बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की चालू वर्षात 50 किलोमीटर तर पुढच्या वर्षात 60 किलोमीटरच्या मेट्रो मार्गीकीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मानस हा आहे 2027 पर्यंत मुंबईत चालू असलेली विविध मेट्रोची कामे ही पूर्ण करण्याची आशा यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली तसेच या मेट्रो लाईन लाईन मुळे शहराला सिमलेस कनेक्टिव्हिटी व निर्माण झालेली अतिरिक्त वाहतूक कोंडी दूर होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीचा अतिरिक्त ताण देखील कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी या मेट्रोमार्गिकेचा विरार पर्यंतच्या विस्तारामुळे मुंबई उपनगरातील विविध शहरे तसेच ठाणे, पालघर रायगड या शहरांना देखील याचा निश्चितच फायदा मिळणार असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे दरवर्षी 50 ते 60 किलोमीटर मेट्रो लाईन मार्गीकीचे काम पूर्ण करण्याची ध्येय निश्चित केले असल्याचे सांगितले आहे तसेच या सोहळ्या दरम्यान बोलताना शिंदेंनी ठाकरेंना अप्रत्यक्षरीता टोला देखील लगावला 2018 मध्ये मंजुरी मिळालेल्या या मीरा-भाईंदर मेट्रो प्रकल्पाला मागच्या काही काळामध्ये सरकारने स्थगिती दिली होती परंतु पुन्हा एकदा आमचे सरकार आल्याने या प्रकल्पातील अडथळा दूर करून या प्रकल्पाला पुन्हा प्रगतीपथावर आणण्याचे काम हे आपल्या सरकारने केले आहे असे यावेळी शिंदे साहेबांनी सांगितले.
या मेट्रो लाईन नाईन च्या चालू असलेल्या विविध चाचण्या पूर्ण करून त्यांना गरजेचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून डिसेंबर अखेरपर्यंत दहिसर काशिगाव टप्पा पूर्ण करून हा सामान्य मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचे आयोजन देखील एमएमआरडी ने केले आहे . बहुचर्चित असलेल्या वाढवण बंदराला देखील या मेट्रो लाईनी कसे कनेक्ट करता येईल याविषयीचा विचार करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आलेले आहे बहुचर्चित असलेल्या वाढवण बंदराला बुलेट ट्रेन ना कनेक्टिव्हिटी मिळणार आहे तसेच मेट्रो ने यास कनेक्टिव्हिटी मिळाल्यास निश्चितच मोठ्या प्रमाणात फायदा हा होणार असल्याचे सांगितले जात आहे वाढवण बंदर हे राज्य शासनाच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पापैकी एक आहे त्यामुळे मेट्रो लाईन मुळे या बंदराशी कनेक्टिव्हिटी साधून राज्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक स्तरावर याचा फायदा कसा होईल याविषयीची चाचणी करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आले.
या मेट्रो लाईन मुळे मीरा-भाईंदर पासून पुढे विरार पर्यंतचा मेट्रोच्या विस्तारामुळे मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही दूर होण्यास मदत मिळणार आहे त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील विविध वाहतूक विषयी समस्या देखील दूर होणार आहेया सोहळ्याला संबोधित करताना महाराष्ट्र राज्याचे प्रमुख मंत्री अजित पवार यांनी देखील महायुतीचे सरकार हे पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध व वचनबद्ध आहे असल्याचे सांगितले आहे.
या मेट्रो लाईन मुळे शहरात निर्माण होणारी प्रदूषणाची समस्या देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे कारण मोठ्या प्रमाणात द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होऊन वेळ आणि पैसा या दोन्हीची बचत यामुळे सामान्य मुंबईकरांची होणार आहे त्यामुळे निश्चितच या मेट्रो लाईन मार्गी के मुळे शहरातील विविध समस्या सुटण्याचे काम यामुळे होणार आहे . या सोहळ्या दरम्यान विविध स्तरातील मान्यवर देखील उपस्थित होते .