म्हाडा कडून मुंबईकरांना मोठ दिवाळी गिफ्ट 5 हजार घरांची घोषणा | Mhada Diwali Gift For Mumbaikar

म्हाडा कडून मुंबईकरांना मोठा गिफ्ट दिवाळीच्या दरम्यान पाच हजार घरांची घोषणा करण्यात आलेली आहे त्यामुळे सामान्य मुंबईकरांना ज्यांना मुंबईत स्वतःचं घर घ्यायचं आहे त्यांना निश्चितच दिलासा मिळालेला आहे .

म्हाडा कडून दिवाळीमध्ये होणारा पाच हजार घरांची लॉटरी
Image credits – pixabay

म्हाडा कडून मुंबईकरांना मोठ गिफ्ट

सोमवारी म्हाडा मुख्यालय वांद्रे येथील नागरी सुविधा केंद्र व अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन हे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हातून करण्यात आले त्यावेळी संजीव जयस्वाल यांनी मुंबई शहरात विविध ठिकाणी पुनर्विकास प्रकल्पाचे काम हे प्रगतीपथावर असून दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होतील असे सांगितले त्यामुळे सप्टेंबर ते ऑक्टोबर च्या दरम्यान 5000 घरांची लॉटरी ही म्हाडाकडून काढण्यात येणार असल्याचे सांगितले .

सध्याला मुंबईमध्ये विविध भागात इमारतींच्या पुनर्वसनाचे काम हे चालू आहे ते एक बहादूर नगर, मोतीलाल नगर, आदर्श नगर, जोगेश्वरी मधील पीएमजीपी इत्यादी विविध इमारतींच्या पुनर्विकासाचे काम हे हाती घेण्यात आलेले आहे त्या अंतर्गतच मोठ्या प्रमाणात घरांची उपलब्ध ही दिवाळीच्या सप्टेंबरच्या ऑक्टोबर महिन्यादरम्यान सामान्य मुंबईकरांना मिळणार आहे त्यामुळे दिवाळीचा मोठा गिफ्ट हे सामान्य मुंबईकरांना यादरम्यान मिळणार आहे प्रत्येक सामान्य नागरिकाचे मुंबईत घर असावं असा स्वप्न असतं यालाच या उपक्रमांतर्गत मूर्तिमंत स्वरूप हे प्राप्त होणार आहे .

बीडीडी चाळीतील घरांचा ताबा 15 मे पर्यंत

बहुचर्चित असणाऱ्या वरळी येथील बीडीडी चाळीतील 556 घरांचा ताबा देखील पुढच्या पंधरा दिवसात मिळणार असल्याचे देखील यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले त्यामुळे काहीशा वादात अडकलेल्या वरळीतील बिडी चाळीतील नागरिकांच्या घरांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे पुनर्विकास प्रकल्पाच्या विविध मुद्द्यांच्या आधारे वरळीतील बीडीडी चाळ ही पुनर्विकसित करण्यात आली होती त्यात 40 मजली दोन इमारतीचे काम हे पूर्ण झालेले होते तसेच पूर्ण झालेल्या या इमारतीतील घरांच्या ताबा हा नागरिकांना मार्च महिन्यामध्येच मिळणार होता परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने त्याचा ताबा हा रखडलेला होता.

म्हाडाच्या या इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र हे मिळत नसल्यामुळे या घरांचा ताबा हा रखडलेला होता मुंबई महानगरपालिकेने लँड अंडर कन्स्ट्रक्शन या करापोटी या इमारतीसाठी 45 कोटी रुपयांची आकारणी केलेली होती त्यामुळेच या इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्र वाटपाचा विषय हा मागच्या काही दिवसांपासून रखडलेला होता पालिकेने केलेल्या या करा संदर्भात माडाने हा कर माफ करावा अशी विनवणी राज्य सरकारकडे केलेली होती.

महानगरपालिकेने मागितलेल्या हा कर माफ करण्यात यावा यासंबंधीची विनवणी ही त्यावेळेस राज्य सरकारकडे केलेली होती परंतु राज्य सरकारकडून यावर तात्काळ कुठलाही निर्णय हा घेण्यात आलेला नव्हता त्यामुळे घरांची कामे पूर्ण असून देखील याचा ताबा हरकतदारांना मिळवत नव्हता त्यावरच तोडगा म्हणून एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम घेऊन ना हरकत प्रमाणपत्र द्यावे अशी विनवणी ही म्हाडाने मुंबई महानगरपालिकेला केलेली होती .

मुंबई महानगरपालिकेने त्यांची ही मागणी मान्य करत एकूण रकमेच्या 10% रकमे घेऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती मान्य केली व त्यामुळेच ना हरकत प्रमाणपत्र त्याचप्रमाणे भोगवट प्रमाणपत्राचा मार्ग देखील मोकळा झाला व वरळीतील बीटी शाळेतील 556 घराचा ताबा हा नागरिकांना मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला व येत्या 15 मे पर्यंत ही प्रक्रिया प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आलेले आहेखरंतर वरळीतील बी डी साल पुनर्विकास प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पासंदर्भातील या निर्णयामुळे नागरिकांना त्यांच्या घराचा ताबा हा लवकरच मिळणार आहे व त्या संबंधीच्या विविध समस्या या मुळे दूर होणार आहेत.

सध्याला शहरात म्हाडा कडून विविध इमारतीच्या पुनर्विकास प्रकल्पाचे काम हे चालू आहे त्यामुळे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर अर्थात सप्टेंबर ते ऑक्टोबर च्या दरम्यान नागरिकांना मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत पाच हजार घरांची करण्यात आलेली ही घोषणा यामुळे सामान्य मुंबईकरांमध्ये आनंदाचे वातावरण हे पसरलेला आहे मुंबईचा रिअल इस्टेट हे सर्वसामान्य नागरिकांना काहीसं न परवडणारा आहे शहरातील घरांच्या किमती या काहीशा प्रमाणात जास्त आहे त्यामुळे प्रत्येकालाच मुंबईत घर घेणे शक्य होत नाही परंतु घरांच्या या लॉटरीमुळे सामान्य नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात दिलासा मिळालेला आहे तसेच म्हाडाच्या घरांच्या किमती बाबत देखील योग्य ते निकष ठरवण्याच्या आदेश हे मागच्या काही काळामध्ये राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहे त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर असलेल्या किमती या नागरिकांना परवडतील अशाच रेंजमध्ये आणण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करत आहे तसेच चालू असलेले विविध विकास कामांमुळे निश्चितच पुढच्या काही काळामध्ये शहरासह रुपये बदलणार असल्याचे विविध अभ्यासकार सांगत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top