मागच्या काही दिवसांपासून बहु चर्चेत असलेल्या एलफिस्टन पुलाच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आली या बैठकीदरम्यान विविध पदाधिकारी तसेच मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार व संबंधित अधिकारी हे उपस्थित होते.

सेंट्रल आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा हा एलफिस्टन पूल पाडण्यावरून मागच्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद विवाद चालू आहेत हा पूल पाडण्याबाबत नागरिकांनी तीव्र विरोध व्यक्त केलेला आहे कारण या पुलाच्या पाडण्यावरून नागरिकांमध्ये विविध मतमतांतरे आहेत यावरच या बैठकीत तोडगा निघालेला आहे.
एलफिस्टन परिसरातील रहिवाशांना दिलासा
एलफिस्टन परिसरातील रहिवाशांना तिथेच घर देण्याचा महत्त्वाचा निर्णय हा या बैठकीत घेण्यात आलेला आहे या पुलाच्या पाडकामादरम्यान 19 इमारती या बाधित होणार होत्या परंतु नवीन आखलेल्या रचनेनुसार आता सध्याला केवळ दोनच इमारती या पाडकामादरम्यान बाधित होणार असल्याचे सांगितले आहे तसेच या एकोणावीस इमारतीच्या पुनर्विकासाची कुठलीही वाट न बघता त्या संबंधित पुनर्विकासाचा निर्णय हा एमएमआरडीने लवकरात घ्यावा असा आदेश देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला.
या पुलाच्या पाडकामा दरम्यान बाधित होणाऱ्या दोन इमारतीतील रहिवाशांना कुर्ला येथे घर देण्यात येणार आहे किंवा मोबदला म्हणून त्याच ठिकाणी त्यांच्या घराचा पुनर्विकास करण्याची मागणी करण्यात आलेली आहे खरंतर मागच्या काही दिवसांपासून या पुलाच्या पाडनीला स्थानिक रहिवाशांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला त्या संबंधित विविध आंदोलनही त्या भागात झाली हा फुल खरंतर 25 एप्रिल पासूनच बंद करण्यात येणार होता परंतु स्थानिक रहिवाशांच्या विरोधानंतर हा पूल सोमवार पर्यंत बंद करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे.
एलफिस्टन पूल बंद झाल्यानंतर वाहतुकीचे विविध पर्याय हे नागरिकांना खुले करण्यात आलेले आहेत या पुलाच्या पाडकामानंतर किंवा बंद झाल्यानंतर नागरिकांना करी रोड येथील पूल किंवा टिळक पुलाचा पर्याय हा खुला करण्यात आलेला आहे व या पर्यायी मार्गांचा वापर हा नागरिकांनी करावा या संबंधिताच्या सूचना देखील प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे. एलफिस्टन पुल हा खरंतर महत्त्वाचा कनेक्टिव्हिटी असलेला पुल आहे परळवून दादर कडे येणाऱ्या सर्व बसेस यास मार्गाने येतात तसेच मोठी वाहतुकीची वर्दळ असणारा हा पूल आहे त्यामुळे या पुलाच्या पाडकामानंतर नागरिकांना करी रोड याचा वापर करावा लागणार आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या ही नागरिकांना निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे असे विविध अभ्यासक सध्याला सांगत आहे .
सोमवारी सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मुंबईचे पालकमंत्री तथा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी या पुला संदर्भात नागरिकांचे असलेली भूमिका व पुलाच्या पाडकांमा दरम्यान नागरिकांनी दर्शविलेला विरोध हा त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला त्या संबंधित बैठकीमध्ये चर्चा झाली व या पाडका मादरम्यान 19 इमारती या बाधित होणार असल्याचे देखील सांगितले यावरच तोडगा काढत नवीन रचना करून सध्याला केवळ दोनच इमारती या पाडकामध्ये दरम्यान बाधित होणार असल्याचे सांगितलेले आहे.
ज्या दोन इमारती बाधित होणार आहेत त्यांना देखील कुर्ल्यातील शिबिरामध्ये घरे तसेच त्यांना त्याच ठिकाणी पुनर्विकासित घरी देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे मुंबई शहरात सध्याला विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकासकामे चालू आहे रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम देखील मोठ्या प्रमाणात शहरांमध्ये चालू आहे तसेच शहरातील कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात कामही सध्याला शहरात चालू आहे.
बहुचर्चित असलेल्या अटल सेतूशी वांद्रे वरळी सागरी हेतू हा थेट जोडण्यासाठी तो एलफिस्टन येथून जाणार असल्याने या पुलाचे पाडकाम सध्याला करण्यात येत आहे तसेच दादरकडे येणाऱ्या बहुतांश एसटी बसेस च्या गाड्या ह्या याच पुलावरून येतात त्यामुळे दादर कडे असणारा मोठ्या प्रमाणात वाहनांचा ओढा हा आता या पुलाच्या पाडकाम्यादरम्यान पूर्ण हा एक तर करी रोड किंवा टिळक रोड या दोन पर्यायी मार्गावरून वळवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे त्यामुळे परळ ते दादर या मार्गातील बहुतांश गाड्या ह्या त्या नवीन मार्गाने येतील खरंतर या पुलाच्या पाडकामानंतर नागरिकांना टिळक पूल आणि करीरोड या दोन पर्यायी मार्गांचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ची समस्या हे पुढील काही दिवस निर्माण होणार असल्याचे सांगितले जात आहे तसेच यामुळे देखील काही अशा प्रमाणात नागरिकांचा प्रवासा किचकट व गुंतागुंतीचा होणार असल्याचे दिसून येत आहे परंतु एकदा या पुलाचे काम झाल्यानंतर निश्चितच नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.