मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीसाठी मुंबई 1 कार्ड लवकरच सुरू होणार ! महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्राच्या रेल्वेसाठी 1 लाख 73 हजार 803 कोटींची भरीव तरतूद केली आहे असे सांगितले त्याचबरोबर विदर्भ व मराठवाडा यांच्यातील वहनाला गती मिळावी यासाठी गोंदिया बल्लारशाह दुहेरीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले त्याचबरोबर महाराष्ट्रातील 132 स्थानकांचा समावेशाही रिडेव्हलपमेंट साठी केला आहे असे देखील सांगितलेले आहे .

मुंबईकरांसाठी खुशखबर मुंबई 1 कार्ड ची घोषणा
मुंबईतील लोकांचा प्रवास हा अतिशय जलद गतीने व्हावा व त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करावा न लागावा यासाठी शासनाने मुंबई 1 कार्ड ची संकल्पना देखील घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. सीएम फडणवीस यांनी सांगितले की एकाच कार्डचा वापर मेट्रो, मोनो रेल, उपनगरीय लोकल गाड्या आणि सार्वजनिक परिवहन बसमध्ये प्रवासासाठी केला जाऊ शकतो आणि मुंबई 1 कार्ड ची “आर्किटेक्चर” एका महिन्यात तयार होईल.
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मधील सार्वजनिक वाहतुकीसाठी मुंबई 1 कार्ड हे एकच कार्ड लवकरच सुरू होणार आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .
मुंबई 1 कार्ड चा वापरामुळे मेट्रो, मोनो रेल, उपनगरीय लोकल गाड्या आणि सार्वजनिक परिवहन बसमध्ये प्रवासासाठी करता येईल. या कार्डमुळे मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा हातभार यामुळे लागणार आहे दर दिवशी हजारो लाखो लोक मुंबईमध्ये लोकल ट्रेन बेस्ट बसेस यांनी प्रवास करतात त्यामुळे त्यांचा वेळ पैसा याची बचत होण्यास निश्चितच त्यामुळे मदत होणार आहे .
केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी मुंबईकरांसाठी विविध प्रकल्पांची सुरुवात केलेली आहे उपनगरीय रेल्वे नेटवर्कसाठी २३८ नवीन एअर कंडिशन गाड्या मंजूर झाल्या आहेत आणि त्यांचे उत्पादन लवकरच सुरू होईल, असे रेल्वेमंत्री म्हणाले. याशिवाय, शहरात १७,००० कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत त्यामुळे मुंबईला निश्चितच विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यास मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे असे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सांगितले .
छत्रपती शिवाजी महाराज ट्रेन लाईनपत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट आयकॉनिक रेल्वे याचे देखील घोषणा केली आहे ज्याद्वारे दहा दिवसांच्या टुरच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील विविध किल्ले त्याचप्रमाणे विविध ऐतिहासिक जागा स्थळे यांना जोडणाऱ्या एका परिपूर्ण लाईनची घोषणा केली आहे या रेल्वे लाईन मुळे महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक स्थळे त्याचप्रमाणे सांस्कृतिक वारसा असलेले विविध स्थळे यांची एकमेकांपासून जोडणी होईल व याचा परिपूर्ण अभ्यास त्याचप्रमाणे याची सफर ही राज्यातील नागरिकांना करता येईल.
मुंबईमध्ये होणार WAVES
WAVES म्हणजेच वर्ड ऑडिओ व्हिच्युअल एंटरटेनमेंट समिट हे समिट मुंबईमध्ये एक ते चार मे रोजी बीकेसी येथील जिओ वर्ड कॉन्व्हेन्शन सेंटर मध्ये होणार आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून होणारा हा सोहळा निश्चितच क्रिएट इकॉनोमीला बुस्ट करण्याचे काम करेल असे प्रतिपादन यावेळी करण्यात आलेक्रिएट इकॉनोमी मध्ये भारताचे स्थान प्रबळ करण्यासाठी निश्चितच व्यवसाय सारखं सामील मदत करेल जगातील ऑडिओ व्हिज्युअल आणि एंटरटेनमेंट याविषयीच्या विविध संकल्पनांचा उलगडा या समितीच्या माध्यमातून होणार आहे या सिमेंट मध्ये देशभरातीलच नव्हे तर जगभरातील विविध लोक यात समाविष्ट होणार आहेत .
मुंबईमध्ये होणार आय आय सी टी
आय आय सी टी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी ची सुरुवात मुंबईमध्ये होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले या प्रकल्पासाठी मुंबईतील फिल्म सिटी मध्ये जागा देण्याचे निश्चित झाले आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले या आयआयसीटीमुळे क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्पेस मध्ये महाराष्ट्र व भारत यांना बुस्ट मिळण्यास निश्चितच मदत होईल असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले .
आयसीटी सारख्या संस्था या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणात कार्य करतील या आय सी टी साठी केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांच्या माध्यमातून याची उभारणी मुंबईमध्ये होणार आहे.
महाराष्ट्रातील 132 स्थानकांचा रिडेव्हलपमेंट मध्ये समावेश केला आहे असे देखील या वेळेस केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले या रिडेव्हलपमेंट मुळे राज्यातील रेल्वे स्थानकांच्या गुणवत्तेमध्ये निश्चितच वाढ होणार आहे त्याचप्रमाणे नागरिकांची होणारी गैरसोय निश्चितच टाळता येईल त्याचप्रमाणे या रीडेव्हलपमेंट मुळे स्थानकांचा रूप हे निश्चितच बदलणार आहे तसेच गोंदिया बल्लारशाह यांच्या दुहेरीकरणामुळे त्याचा फायदा निश्चितच विदर्भाला होणार आहे त्याचबरोबर विदर्भाच्या आसपास असलेल्या छत्तीसगड तेलंगणा या राज्यांशी असलेल्या व्यापारी संबंधाला बळकटी निश्चितच मिळणार आहे गोंदिया सारखे शहर हे छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांशी प्रत्यक्षरीत्या जोडलेला आहे त्यामुळे या दुहेरी कारणामुळे व्यापारी तत्त्वावर याचा फायदा निश्चितच या शहराला होणार आहे तसेच रेल्वेच्या विविध कामासाठी यावर्षी २३,७७८ कोटी रुपयांचे नवीन काम मंजूर झाले आहे .
It’s awesome
Thank you