बेस्ट बसच्या भाडेवाडीचा चा प्रस्ताव मागच्या काही दिवसांपासून प्रस्तावित होता याच प्रस्तावाला अखेर बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंजुरी दिली असून पुढच्या काही काळामध्ये बेस्ट भाड हे दुप्पट होणार आहे मागच्याच काही दिवसांपासून या बसच्या भाडेवाडी साठी कामगार हे आग्रही होते त्यालाच आता मंजुरी मिळालेली आहे .

बेस्ट बस ही मागच्या काही दिवसांपासून तोट्यामध्ये चालत आहे हा तोटा साधारणतः 6000 कोटी रुपयांचा आहे याच तोट्यातून बसला बाहेर काढण्यासाठी विविध प्रयत्नही मागच्या काही दिवसांपासून झाले त्यासंबंधीच्या विविध नियोजन व आराखडा याविषयी चर्चा झाल्या परंतु निवडणुकीचे कारण पुढे करून या सर्व कुठेतरी मागे राहिल्या आता या भाडेवाडीमुळे निश्चितच संचित असलेला हा तोटा भरून काढण्यास प्रशासनाला निश्चितच मदत मिळणार आहे यातून साधारणतः या तोट्यातून बाहेर पडण्यास मदत मिळणार आहे.
या तोट्यामुळे प्रशासनाला बसच्या बाबतीत असताना खर्च देखील भागवणे मुश्किल होत चालले होते तसेच कर्मचाऱ्यांच्या देणी तथा पगार देखील करणे मुश्किल झाले होते त्यामुळे निश्चितच या भाडेवाडीमुळे या सर्व समस्या कुठेतरी दूर होण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
बेस्ट बस भाडं होणार दुप्पट
दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याबरोबर सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीमध्ये भाडेवाडीसाठीचा हा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता व त्यात संबंधित आग्रह देखील धरण्यात आलेला होता. या बैठकीदरम्यान यातून मार्ग काढण्याचा आदेश देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला होताबेस्ट बसच्या महाव्यवस्थापक या पदाचा पदभार श्रीनिवास यांनी स्वीकारल्यानंतरच भाडेवाडीचा प्रस्ताव हा पुढे पाठविण्यात आलेला होता परंतु त्या काळात या प्रस्तावावर कुठलीही चर्चा झाल्याची दिसून आलेले नाही तसेच त्या काळात विविध बाबी पुढे करून हा निर्णय वास्तवात येऊ शकला नाही त्यामुळे निश्चितच या भाडेवाडीमुळे बस प्रशासनाला विविध समस्यातून बाहेर पडण्यास मदत मिळणार आहे.
सध्या बसच्या भाडे आकडेवारीनुसार बस प्रशासनाला साधारणतः 845 कोटी रुपयांचा महसूल हा मिळत आहे या भाडेवाडीनंतर हा महसूल 1400 कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याचे सांगितले जात आहेबेस्ट बस भाडेवाडी चा प्रस्ताव हा मागच्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे 2018 मध्ये देखील बसची भाडेवाडी करण्यात आलेली होती सर्वसाधारण बससाठी साधारणतः आठ रुपये तर वातानुकूलित बससाठी 20 रुपये इतके भाडेवाढ ही करण्यात आलेली होती परंतु नंतरच्या काळामध्ये 2019 मध्ये तत्कालीन महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केलेले या भाडेवाडी मध्ये कपात करून सर्वसाधारण बससाठी पाच रुपये तर वातानुकूलित बससाठी सहा रुपये एवढे दर ठेवल्यामुळे प्रवाशांमध्ये वाढ झाली परंतु मिळणारा उत्पन्न मध्ये एवढ्या प्रमाणात वाढ बघायला मिळाले नव्हती.
बस भाडेवाडीचे दर हे खालील प्रमाणे ठरवण्यात आलेले आहेत
अंतर | सध्या आकारत असलेले भाडे | प्रस्तावित भाडे |
पाच किलोमीटर | पाच रुपये | दहा रुपये |
दहा किलोमीटर | दहा रुपये | पंधरा रुपये |
पंधरा किलोमीटर | पंधरा रुपये | वीस रुपये |
वातानुकूलित बससाठी प्रस्तावित भाडेवाढ
अंतर | सध्या आकारात असलेले भाडे | प्रस्तावित भाडे |
5 किलोमीटर | 6 रुपये | 12 रुपये |
दहा किलोमीटर | 13 रुपये | 20रुपये |
15 किलोमीटर | 19 रुपये | 30रुपये |
20 किलोमीटर | 25 रुपये | 35रुपये |
सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील बेस्ट बसच्या भाडेवाडी संदर्भात दुजोरा दिलेला होता तसेच बसला या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी नवीन उत्पन्नाचे मार्ग निर्माण करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले होते. दर दिवशी हजारो लोक या बसने प्रवास करतात त्यामुळे निश्चितच सर्वसामान्य मुंबईकरांचा जीवनाचा अविभाज्य भाग या बसेस होय परंतु प्रशासनाला झालेल्या या तोट्यामुळे बसचे दैनंदिन खर्च भागवणे देखील प्रशासनाला मुश्किल चाललेले होते त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येवर निश्चितच मदत मिळणार आहे.
खरंतर या भाडेवाडीमुळे बेस्ट बस प्रशासनाला उत्पन्नाच्या माध्यमातून निश्चितच निर्माण झालेला हा तोटा भरून काढण्यास तर मदत मिळणारच आहे तसेच मागच्या काही काळापासून बसच्या अपघातामध्ये देखील काहीशा प्रमाणात वाढ ही बघायला मिळालेली आहे बऱ्याचदा याचं कारण देखील बसमध्ये असलेला बिघाड हे देखील मानलं जात आहे त्यामुळे मिळणाऱ्या या उत्पन्नातून बस दुरुस्ती करता खर्चाची सोय होणार आहे त्यामुळे देखील निर्माण झालेली या समस्या कमी होण्यास मदत मिळणार आहे.
बस प्रशासनाचा महाव्यवस्थापकीय पदाचा पदभार श्रीनिवास यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी भाडेवाडीचा हा प्रस्ताव तात्काळ मांडलेला होता परंतु या प्रस्तावावर त्यानंतरच्या काळात तितक्या प्रमाणात कुठलीही ठोस पावले उचलण्यात आलेली नव्हती परंतु सह्याद्री गृहातील पार पडलेल्या बैठकीनंतर निश्चितच या संबंधित प्रस्तावावर लवकरात लवकर ॲक्शन घेऊन भाडेवाडीचा प्रस्ताव हा मंजूर करण्यात आलेला आहे व त्या संबंधित भाडे वाढ ही लवकरच होणार असल्याचे सांगितले जात आहे .