हार्बर रेल्वेच्या चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणी साचून पावसाळ्यात दरवर्षी रेल्वेची सेवा विस्कळीत होते अशा स्थितीत प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिरंगाईचा सामना करावा लागतो अशा स्थितीत पाण्याचा हा झालेला साठा योग्य प्रमाणात विसर्गित व पाण्याचा झालेला हा साठा योग्य वेळी निचरा करून वाहतुकीचा हा झालेल विस्कळीतपणा कमी करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी या सर्व कामाची पाहणी महानगरपालिकेकडून करण्यात आली .

हार्बर रेल्वे पावसाळ्यातही धावणार सुसाट
मुंबईतील बहुतांश परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वॉटर ब्लॉकेज निर्माण होतं त्यातच हायवे सोसायटी सारखे भाग हे जमिनीच्या पातळीपेक्षा खाली असल्याने यात बऱ्याचदा मोठ्या प्रमाणात पाणीच असते हे पाणी महामार्ग लगतच्या जलवाहिनीत सोडण्यात येते व जलवाहिनी द्वारे हे पाणी रेल्वे रुळावरून काढून इतरत्र संचलित करण्यात येते. परंतु पावसाळ्यात होणाऱ्या पाण्याच्या संच यामुळे तसेच पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत नाही अशा स्थितीत याचा परिणाम हा हार्बर रेल्वे परिणामी लोकल ट्रेनला भोगाव लागतो व हार्बर रेल्वे मोठ्या प्रमाणात विस्कळीत होते .
या भागात पाण्याच्या उपशामुळे साचलेले हे पाणी याच उपसा करून ते पाणी समर्थ नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर टाकले जाते व वांद्रातील कनेक्टर खाली असलेल्या नाल्याला जाऊन मिळते या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सध्याला चालू आहे हे काम 31 मे 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देखील यावेळी देण्यात आलेले आहे.
या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी व पाण्याचे योग्य प्रमाणात विसर्ग होण्यासाठी महानगरपालिकेकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहे ते अंतर्गतच हायड्रोलिक सर्वेक्षण करून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी पाण्याचा निचरा योग्य प्रमाणात होण्यासाठी विविध उपाय योजना आखण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.
या हायड्रोलिक सर्वेक्षणामुळे साचलेले पाणी कमी होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे व त्यामुळे परिसरालगतचा पाणी पर्जन्यजन्य जलवाहिनीद्वारे बाहेर काढून खोळंबलेली वाहतूक पूर्वपदावर येण्यास निश्चितच मदत होणार आहे .
शहरातील हवामान हे दिवसेंदिवस बदलत जातं त्यामुळे शहरात पावसाळ्यापूर्वी चालू असलेल्या विविध कामांचा पाहणी दौरा करताना मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी विविध ठिकाणी भेटी दिल्या चेंबूरस्थित शेल कॉलनी येथील भुयारी मार्ग नाला, मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर येथील भुयारी मार्ग, हिंदमाता पावसाळी पाणी साठवण टाकी टेंभे पूल, शहर विभागातील चुनाभट्टी रेल्वे स्थानक, इत्यादी ठिकाणी पाहणी दौरा झाला तसेच समर्थ नगर सोसायटी, वांद्रे कुर्ला संकुल जोड रस्ताचुनाभट्टी रेल्वे स्थानक, हायवे सोसायटी या विविध ठिकाणी देखील पाहणी दौरा झाला.
आयओटी तंत्रज्ञानाचा वापर
आय ओ टी अर्थात इंटरनेट ऑफ थिंक याची जोड घेऊन शहरात असलेल्या विविध पंपांना याद्वारे जोडून त्यांच्यात सेन्सर बसवावे या सेंसर द्वारे जर मोठ्या प्रमाणात पाणी साचले तर याची माहिती योग्य व कमी वेळेत आपत्ती व्यवस्थापनाच्या विभागाला देऊन रियल टाईम अर्थात कमी वेळेत त्यासाठी लागणारे उपाययोजना आता येतील यासंबंधीचे निर्देश देखील यावेळी देण्यात आले निश्चितच आयूटी सारख्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे याचा फायदा हा निर्माण होणाऱ्या अतिरिक्त समस्या कमी होण्यास होणार आहे .
सध्याला मुंबई शहरात विविध ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे शहरातील मानखुर्द ,महाराष्ट्र नगर इत्यादी ठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे त्यामुळे त्यालगत असणाऱ्या नाल्याचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे निर्देश देखील यावेळी पालिका कडून देण्यात आले त्यामुळे भविष्यात पावसाळ्याच्या पाण्यामुळे या ठिकाणी कुठलीही समस्या निर्माण होणार नाही तसेच या भागात असलेले पाणी उपसा केंद्र योग्य वेळेत कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश देखील यावेळी पालिकेकडून देण्यात आले पाणी उपसा केंद्राने साचलेला पाण्याचा विसर्ग करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते .
अतिवृष्टी दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाटर ब्लॉकेज होऊन मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होते अशा स्थितीत याचा परिणाम हा दैनंदिन जीवनावर निश्चितच होतो मुंबई शहरात चालू असलेल्या लोकल ट्रेनला देखील याचा फटका मोठ्या प्रमाणात जाणवतो मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे ,पश्चिम उपनगरातील विविध रेल्वेंना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसतो यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होते परिणामी नागरिकांची मोठ्या प्रमाणात हाल होतातया सर्व गोष्टींची दक्षता घेऊनच महानगरपालिकेने यावेळी पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात विविध योजना आखत कामांचा पाहणी दौरा सुरू केलेला आहे . यावेळी विशेषतः हार्बर रेल्वेच्या रेल्वे रुळाची पाहणी करण्यात आली
मुंबई शहराचे शहर रचना आणि हवामान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे शहरात असलेली बहुतांश इमारती त्याचप्रमाणे रस्ते यांना मोठ्या प्रमाणात आधुनिक त्याचप्रमाणे ब्रिटिशकालीन नगर रचनेचा ढाचा आहे त्यामुळे जुन्या आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने असलेल्या विविध कामे ही शहरात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सर्व गोष्टींचा विचार करतच नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी शासन नेहमीच मोठ्या प्रमाणात प्रयत्नशील असते.