मालमत्ता आणि रिअल इस्टेट डाटाबेस गायब झाल्यामुळे मुंबईतील रिअल इस्टेट मार्केटला धक्का बांधकामा संबंधीच्या विविध योजना आपल्यासाठी त्याचप्रमाणे बांधकामाचे योग्य ते नियोजन करण्यासाठी व त्यांच्या मंजुरी मिळवण्यासाठी मालमत्ता आणि डाटाबेस लेआउट याची आवश्यकता असते परंतु सरकारी वेबसाईटवरून हेच मालमत्ता आणि डाटाबेस लेआउट अचानक गायब झाल्याने याचा फटका मुंबईतील रिअल इस्टेट उद्योगाला बसलेला आहे या माहितीच्या अचानक गायब झाल्यामुळे याचा परिणाम हा रिअल इस्टेट उद्योगाला सध्या जाणवत आहे.

सरकारी वेबसाईटवर उपलब्ध असलेली हा मालमत्ता आणि लेआउट डेटाबेस ची माहिती ही बांधकामाचे नियोजन करण्यासाठी केला जातो त्यामुळे अचूक व योग्य नियोजन करून भविष्यात निर्माण होणाऱ्या बऱ्याचशा समस्या आपल्याला जाणवत नाही परंतु ऑनलाईन उपलब्ध असलेली ही माहिती अचानकपणे गायब झाल्याने याचा फटका रियल इस्टेट उद्योगाला सध्याला बसत आहे.
ऑनलाइन उपलब्ध असलेल्या या डिजिटल डेटाबेस बॅक आउट झाल्यामुळे सध्या निर्माण झालेली ही परिस्थिती तसेच सरकारला प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कार्ड, मुंबई शहरातील मालमत्तेच्या सेस तपशीलांची ऑनलाइन माहिती आणि सरकारी वेबसाइट्सवरून गायब झालेल्या 114 MHADA लेआउटच्या शीट्स पुनर्स्थापित करण्याची विनंती हीकन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन्स ऑफ इंडिया-महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री (CREDAI-MCHI) आणि प्रॅक्टिसिंग इंजिनीयर्स, आर्किटेक्ट्स, टाऊन प्लॅनर्स असोसिएशन (PEATA) केली आहे.
रिअल इस्टेट
शहर नियोजनासाठी त्याचप्रमाणे करंट प्रो रेट अर्थात एखाद्या भागाचा सध्या वेळेनुसार केले जाला जाणारा करार किंवा त्याची ठरवली जाणारी किंमत यासाठी लागणारी माहिती तसेच एफएसआय डिटेल अर्थात फ्लोअर स्पेस इंडेक्स म्हणजेच एखाद्या जमिनीच्या भागावर तुम्ही किती बांधकाम करू शकतात याविषयी लागणारा तपशील हा म्हाडाच्या वेबसाईटवर अजून जुनाच आहे त्यामुळे बऱ्याचशा करारा अनुरूप समस्या याच ठिकाणी निर्माण होत आहेत वयात देखील फटका बांधकाम व्यवसायिकांना पडत आहे
नगर विकास खात्याचे मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवलेल्या या पत्रामध्ये विविध गोष्टींचा समावेश हा केला आहे या पत्रामध्ये प्रामुख्याने ऑनलाइन डाटाबेस गायब झाल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या त्याचप्रमाणे सद्यस्थितीत या ऑनलाइन डाटाबेस गायब झाल्यामुळे कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी साधारणतः 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागत आहे त्यामुळे हा विलंब वाढत आहे हे देखील त्यात नमूद करण्यात आले आहे
CREDAI-MCHI चे अध्यक्ष डोमिनिक रोमेल म्हणाले, “घरे बांधण्याची किंवा जुन्या घरांची दुरुस्ती करण्यासाठी योजना आखणाऱ्या नागरिकांसाठी, तसेच बांधकामा संबंधी विविध गोष्टी करण्यासाठी काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी, अचूक मालमत्ता डेटाची ऑनलाइन उपलब्ध असलेली माहिती ही खरच गरजेचे असते.
PEATA चे मिलिंद चंगाणी म्हणाले, “या साइट्स विविध प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती पुरवतात, जी सोसायटी आणि जमीनमालकांना पुनर्विकासासाठी पुढच्या योजना पण नियोजन आखण्यासाठी फार गरजेची असतात.
मुंबईतील रियल इस्टेट हे खरंतर जगातील सगळ्यात महाग मानलं जातं मुंबईत आपलं हक्काचं आणि स्वतःच घर असावा प्रत्येकाचा स्वप्न असतं साउथ मुंबईतील नरिमन पॉईंट, कोलाबा, मलाबार हिल त्याचप्रमाणे पश्चिम उपनगरातील वांद्रे, सांताक्रुज, अंधेरी यांसारख्या भागांमध्ये सध्याला दिवसेंदिवस घरांची आणि जागेची किंमत ही वाढत चाललेली आहे तसेच सर्वसामान्य मराठी माणसाला मुंबईत एफर्टेबल स्वरूपात स्वतःच घर मिळवून देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असतो.
मुंबई, नवी मुंबई त्याचबरोबर सध्या असलेले NAINA अर्थात नवी मुंबई एअरपोर्ट नोटिफाईड एरिया मध्ये विविध मोठे विकास प्रकल्प चालू आहेत तसेच कोस्टल रोड, ट्रान्स हार्बर लिंक ,मुंबई अहमदाबाद हाय स्पीड बुलेट ट्रेन त्याचबरोबर चालू असल्यामुळे जमिनीचे भाव सध्याला गगनाला भिडलेले आहेत रहिवासी त्याचप्रमाणे कमर्शियल प्रॉपर्टी या दोन्हींच्या भावांमध्ये सध्याला तितकाचा फरक बघायला मिळत नाहीये तसेच धारावी पुनर्वसन प्रकल्पासारखे विविध मोठमोठाले प्रोजेक्ट सध्याला चालू आहेत.
Naina अर्थात नवी मुंबई एअरपोर्ट नोटिफाईड एरियाजिल्हा साधारणता तिसरे मुंबई अर्थात महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाकांक्षा असलेला हा प्रोजेक्ट भविष्यात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक व्यापारी त्याचप्रमाणे औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विरोध निर्माण करणार आहे त्याचप्रमाणे या सिटीमध्ये वापरले जाणारे विविध संकल्पना त्यात असलेली ग्रीन सिटी ची संकल्पना यामुळे त्या ठिकाणी असलेले योग्य जलसंधारणाचा नियोजन उद्यान हिरवळ याचे योग्य प्रमाणात नियोजन त्याच प्रमाणात त्या परिसर परिसराच्या सभोवताली असणारी उत्तम कनेक्टिव्हिटी वाहतुकीची विविध साधने आणि घरांची केली जाणारी रचना ही अतिशय प्रगल्भ स्वरूपाची आहे त्यामुळे देखील मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ ही बघायला मिळणार आहेत खरंतर एखाद्या क्षेत्राचा विकास झाल्यास त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगारीची निर्मिती तसेच नागरिकांचे जीवनमान राहणीमान त्याचप्रमाणे शहराचा व राज्याचा आर्थिक विकास होण्यास मोठ्या प्रमाणात हातभार लागतो.