मुंबईच्या हवामानात उष्णतेसोबत आद्रतेची भर कडकडत्या उन्हात उष्णतेबरोबरच पुढील काही दिवस आद्रतेचा देखील मोठ्या प्रमाणात सामना करावा लागणार आहे खरं तर या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वाढायला सुरुवात झालेली आहे सरासरी नुसार सध्याला 32 डिग्री पासून ते 36 डिग्री पर्यंत तापमान बघायला मिळत आहे यात उष्णते बरोबर मुंबईमध्ये सध्याला आद्रतेच प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल आहे त्यामुळे अगोदरच उष्णतेने परेशान असलेल्या लोकांना त्यातच आद्रतेचा आणखी त्रास सहन करावा लागत आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वाढायला सुरुवात झालेली आहे उत्तर भारत आणि मुंबईच्या आसपास असणाऱ्या राज्य यांच्याकडून मोठ्या प्रमाणात उष्णतेचे वारे सध्याला मुंबईकडे वाहत आहेत त्यामुळे तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली बघायला मिळत आहे त्यातच मुंबई समुद्र स्थित असल्यामुळे समुद्राच्या पाण्याने निर्माण होणाऱ्या आद्रतेचा परिणाम देखील या परिस्थितीत निश्चितच वाढणार आहे.
सध्याला वाढलेले हे तापमान केवळ मुंबईमध्येच नव्हे तर आसपास असणारे मुंबई उपनगरात त्याचप्रमाणे विविध भागात ठाणे, डोंबिवली, कल्याण विरार या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाका वाढलेला आहे अशा स्थितीत नागरिकांनी देखील आपल्या आरोग्य विषयीची काळजी घेतली पाहिजे केवळ काम असल्यावरच बाहेर पडावे तसेच काही कामानिमित्त बाहेर पडणे झाल्यास शरीराची आरोग्याची योग्य ती काळजी घेऊनच बाहेर पडावी.
एप्रिल महिन्यातच तापमानाने मोठ्या प्रमाणात उंची गाठलेली आहे त्यामुळे मे महिन्यात देखील उष्णतेची ही लाट बघायला मिळेल असे विविध हवामान अभ्यासक सांगत आहेत कारण मे महिन्यात एप्रिल महिन्यापेक्षा जास्त प्रमाणात उष्णता ही बघायला मिळते त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी राखतच आपली दैनंदिन कामे केली पाहिजे तसेच भोवताली असणाऱ्या पाणी साठ्याचा देखील जपून वापर केला पाहिजे कारण सध्याला मुंबई शहराला पाणीपुरवठा करणार धरणांमध्ये केवळ 33% च्या साठा उपलब्ध आहे त्यामुळे पावसाळा येईपर्यंत या पाण्याचा जपून वापर प्रत्येक नागरिकांना केलाच पाहिजे त्यामुळे अनावश्यक होत असलेल्या पाण्याचा वापर देखील टाळायला पाहिजे.
मुंबईच्या हवामानात मोठ्या प्रमाणात आद्रता का आहे?
भौगोलिक दृष्ट्या मुंबई ही अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे त्यामुळे कडकडत्या उन्हात समुद्रातील पाण्याचा होणारा बाष्पीभवन होऊन व त्यातून निर्माण होणाऱ्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आद्रता ही निर्माण होते त्यातच मुंबईमध्ये असलेल्या मोठमोठ्या बिल्डिंग्स काँक्रीटच्या इमारती त्यामुळे वारा तितक्या प्रमाणात खेळत नाही अशा स्थिती मोठ्या प्रमाणात आद्रता निर्माण व्हायला सुरुवात होते . याच आद्रतेचा शरीरावर देखील परिणाम आपल्याला बघायला मिळतो कारण वाढत्या होण्याच्या कडाक यामुळे निश्चितच शरीरातील तापमान हे मोठ्या प्रमाणात वाढत त्यामुळे शरीराला घामाच्या धारा लागतात परंतु हवेतील असणाऱ्या आद्रतेमुळे या घामाचे शोषण होत नाही त्यामुळे त्वचेला अतिरिक्त प्रमाणात चिकटपणाचा सामना करावा लागतो.
समुद्रकिनारी वास्तव्य असल्यामुळे बऱ्याचदा समुद्रातील वारे हे शहरात वाहतात ही वारे मोठ्या प्रमाणात मोठ मोठ्या बिल्डिंग व इमारतीमुळे आतल्या आतच कोंडली जातात त्यातच सूर्यप्रकाशामुळे या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात आद्रता निर्माण होते.
हवामानातील या वातावरणामध्ये त्वचेला विविध समस्या निर्माण होतात बऱ्याचदा फंगल इन्फेक्शन ची शक्यता जास्त असते हे महत्त्वाचे खास पण आहे ना त्वचेवर पुरळ निर्माण होणे यांसारखे विविध समस्या बघायला मिळतात अशा स्थितीत शरीराला हायड्रेट ठेवत अर्थात भरपूर प्रमाणात पाणी राहिल्यास याचा तितकासा धोका जाणवत नाही तसेच त्वचेच्या विविध संसर्गजन्य व्याधी होण्याचा देखील धोका असतो त्यामुळे अशा स्थितीत आपली योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे.
राज्याच्या एका बाजूला उष्णतेच्या मोठ्या झळा जाणवत आहे तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देखील हवामान खात्याने दिलेला आहे विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे मध्य भारतात कमी उष्णतेच्या दाबामुळे निर्माण झालेल्या पट्ट्यामुळे मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाची शक्यता काही भागांमध्ये वर्तवले गेलेली आहे या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली गेलेली आहे विदर्भातील काही प्रमुख जिल्ह्यांना अवकाळीचा फटका बसणार असल्याचे दिसत आहे प्रामुख्याने यवतमाळ ,अमरावती ,गोंदिया, वाशिम, वर्धा यांना पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे.
यंदाही राज्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे राज्यात जून ते सप्टेंबर दरम्यान पावसासाठी अनुकूल असणारे परिस्थितीत चांगल्या प्रमाणात पाऊस राहील त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्याच भागात चांगला पाऊस होईलसरासरीपेक्षा चांगला पाऊस पडणार आहे असे हवामान खात्याने सांगितल्यामुळे राज्यातील बळीराजा हा सुखावला आहे सध्याला कुणाच्या प्रचंड तापामुळे सध्याला बळीराजा हा पावसाची वाट बघत आहे.