मुंबईला भंगार वाहन विल्हेवाटाची सुविधा मिळणार प्रदूषण निर्माण करणारे जुनी वाहने हद्दपार करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात प्रदूषण निर्माण करणाऱ्या वाहनांच्या विल्हेवाटासाठी धोरण आखण्यात आले होते या धोरणा अंतर्गतच विविध ठिकाणी प्रदूषण विल्हेवाटासाठी केंद्रे उभारण्यात आलेली आहे.

मुंबईतील वाहनांसाठी पनवेल कर्जत या ठिकाणी केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे या धोरण अंतर्गत जर वाहन मोडीत काढल्याचा निर्णय जर तुम्ही घेतला तर नवीन वाहनासाठी योग्य ती किंमत व त्याच्या खरेदी करण्यासाठी तुम्हाला पंधरा टक्के सवलत लाभ देखील मिळणार आहे .
जुनी वाहने मोडीत काढता यावी यासाठी राज्यात विविध ठिकाणी या विल्हेवाट केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे सध्याला राज्यामध्ये जालना ,पुणे ,रायगड ,नाशिक या ठिकाणी यासंबंधीचे केंद्र आहेत तसेच राज्यात विविध सात ठिकाणी आणखी केंद्रे उभारण्याची परवानगी शासनाने दिलेली आहे .वार्षिक कर लागू असलेल्या वाहनांना वाहन नोंदणीच्या तारखेपासून पुढील आठ वर्षांपर्यंत, तर परिवहनेतर प्रकारातील वाहनांसाठी 15 वर्षांपर्यंत 15 टक्के सवलत देण्यात येणार आहे.
मुंबईला भंगार वाहन विल्हेवाटाची सुविधा मिळणार
खरंतर मुंबई सारख्या शहरांमध्ये दर दिवशी हजारो वाहनांची रेलचाल रस्त्यावरून असते त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुर व त्या संबंधीच्या समस्या निर्माण होतात अशातच सध्याला कडकत्या उनाच्या तापमानामुळे तसेच उष्णतेच्या व आद्रतेच्या या वातावरणात वाहनातून निर्माण होणारी धुर व धूळ हे निश्चितच आरोग्यासाठी घातक ठरतात त्यामुळे प्रदूषण निर्माण करणारे बहुतांश वाहने जर हद्दपार केली तर याचा फायदा निश्चितच सर्वसामान्य नागरिकांना होणार आहेकर्जत आणि पनवेल या भागामध्ये प्रामुख्याने या केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे त्यामुळे सामान्य मुंबईकर नागरिकांना याचा फायदा घेण्यासाठी त्यांची वाहने ही कर्जत व पनवेल घेऊन जावे लागणार आहे .
मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर हा दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे सध्या आकडेवारीनुसार मुंबईचा एअरक्वालिटीइंडेक्स हा मध्यम स्वरूपाचा आहे शहरात विविध ठिकाणी चालू असलेली बांधकामे त्याचप्रमाणे निर्माण होणारा प्रचंड कचरा व त्यातच वाहनातून निर्माण होणारा धूर या सर्व कारणांमुळे हवेची गुणवत्ता ही खरच दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे त्यामुळे या विल्हेवाट केंद्राचा फायदा निश्चितच सामान्य नागरिकांना होणार आहे .
भंगार वाहन विल्हेवाट सुविधेचे काही फायदे
या अंतर्गत जर तुम्ही तुमची वाहने मोडीत काढली तर तुम्हाला जुन्या वाहनाचा नंबर नवीन वाहनासाठी वापरता येतो त्याचप्रमाणे या वाहनाची योग्य ती विल्हेवाट लावल्यामुळे तुम्हाला नवीन वाहन खरेदी करण्यासाठी निश्चितच करामध्ये सवलत मिळते जर तुमचा वाहन जुना झाला असेल तर निश्चितच ते एखाद्या अशा ठिकाणी पडून राहते तिथे कोणाच्याच उपयोगी नसते अशा स्थितीत बऱ्याचदा याचा वापर हा गैर कामासाठी केला जातो त्यामुळे जर याची विल्हेवाट योग्य प्रमाणात लागून जर तुम्हाला मिळत असेल तर याचा फायदा तुम्हाला निश्चितच मिळेल बऱ्याचदा आयुर्मान पूर्ण झालेली वाहने आपण तितक्या प्रमाणात वापरात आणत नाही त्यामुळे ती तशीच पडून राहतात अशा स्थितीत त्यांना या केंद्रात मोडीत काढल्यास त्यांचा पुनर्वापर हा निश्चितच होतो बऱ्याचदा वाहनांची असणारी विविध भाग अर्थात पार्टस हे पुनर्वापर करण्यास वापरली जाऊ शकतात गाडीचा टायर तसेच गाडीमध्ये असणारे विविध मटेरियल हे निश्चितच पुनर्वापर करून वापरला जाऊ शकतो.
प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण आणि शहरीकरण वाढल्यामुळे तसेच चेंबूर या भागात असणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात धूर हवेत मिसळतो तसेच प्रदूषणकारी असणारे जुने वाहने यांच्यामुळे देखील या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होते त्यामुळे याचा मोठा प्रमाणात त्रास नागरिकांना सहन करावा लागतो त्यामुळे निश्चितच प्रदूषण निर्माण करणारी जुनी तसेच विविध वाहने जर या विल्हेवाट केंद्रात मोडीत काढण्यात आली तर याचा फायदा हा निश्चितच निसर्गाला व परिणामी आपल्याला होणार आहे .
शहरात वाढत चाललेले या प्रदूषणाच्या समस्येवर महानगरपालिका मोठ्या प्रमाणात विविध उपायोजना या राबवत आहे तसेच शहरात सार्वजनिक वाहतुकीचे विविध माध्यमे जसे की बेस्ट बसेस लोकल ट्रेन मेट्रो तसेच जलवाहतुकीचे विविध पर्याय हे सर्व नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन कामासाठी वापरावे ज्यायोगे शहरात जास्त प्रमाणात प्रदूषणाची समस्या वाढणार नाही यासंबंधी बृहन्मुंबई महानगरपालिका ही नेहमीच कार्यरत असते
परिवहन विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे निश्चितच सर्वसामान्य मुंबईकरांना याचा निश्चितच फायदा होणार आहे राज्यात अन्य ठिकाणी देखील अशाच प्रकारची भंगार वाहन विल्हेवाट केंद्रे उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे शासनाकडून सांगण्यात आलेले आहे. तसेच विविध ठिकाणी यासाठी मंजूर देखील देण्यात आलेली आहे असे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे