धारावीसाठी देवनार कचरा भूमीची जागा देण्यास विरोध |Opposition to allocating Deonar waste land for Dharavi

धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम सध्याला जोराने चालू आहे त्यातच या पुनर्विकास प्रकल्पासाठी देवनार कचरा भूमीची 124 एकर जागा राज्य सरकारने देण्यासाठी ठरवलेले आहे देवनार कचरा भूमी ही जागा केंद्र शासनाच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार पुढील पंधरा वर्षे या जागेवर कोणतेही काम करता येणार नाही असे असताना देखील राज्य शासनाने ही जागा देऊ केल्याने एका सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेऊन त्याविषयीचे संबंधित नोटीसी मुंबई महानगरपालिका व राज्य सरकारला पाठवलेली आहे.

देवनार कचरा भूमी धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी देण्यास विरोध
Image credits – pixabay

धारावी पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत धारावीकरांना घर देण्यासाठी मुंबईतील विविध जागांचा विचार करण्यात येत आहे त्यातच या भागातील देवनार या कचरा भूमीची जागा देखील देऊ करण्याचे योजिले आहे खरं तर या भागावरची कचरा भूमी खूप जुनी आहे मागच्या बऱ्याच वर्षापासून या जमिनीवर मोठ्या प्रमाणात कचरा व कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया ही चालू आहे त्यामुळे ही जागा या प्रकल्पाला देऊ नये अशा प्रकारची नोटीस एका सामाजिक कार्यकर्त्याने पाठवलेली आहे.

देवनार कचरा भूमी

खरंतर मुंबई उपनगरातील शिवाजीनगर या भागात स्थित आहे मुंबईतीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठी ही कचरा व्यवस्था आहे मुलुंड कांजूरमार्ग व या सर्व कचऱ्याच्या डम्पिंग ग्राउंड चे व्यवस्थापन हे सध्याला बृहन्मुंबई महानगरपालिका बघत आहे देव नारच्या याच कचरा भूमित मागच्या काही काळात कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज निर्मिती करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला होताया भूमीच्या आसपासच्या परिसरात म्हणजेच चेंबूर मानखुर्द या भागात या कचरा भूमीमुळे काही अशा प्रमाणात काही त्रास त्यांना देखील सामोरे जावे लागत होते जसं की या डम्पिंग ग्राउंड मधील कचऱ्याला बऱ्याचदा आग लागल्यामुळे धुराचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत होते त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा परिणाम पकडल्यामुळे यासंबंधी देखील विविध तक्रारी येथे स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे केलेल्या होत्या .

त्यामुळे या कचरा भूमीत असणाऱ्या कचऱ्याचे आधुनिकरीत्या तसेच विज्ञानाचा योग्य प्रमाणात व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून विले वाट लावावी असा प्रयत्न शासनाने करावा याविषयी विविध स्तरातून प्रयत्न केले जात होते.

धारावी पुनर्विकास प्रकल्प

मुंबईतील धारावीतील प्रत्येकाला घर या संकल्पनेतून या पुनर्विकास प्रकल्पाची उभारणी झाली त्याचं काम सध्याला झपाट्याने चालू आहे परंतु याच काळात याविषयी विविध संभ्रम देखील काहीशा प्रमाणात निर्माण झाले तळमजल्यावरील पात्रधारकांना अपात्र ठरवण्यासाठी जबरदस्तीने शपथपत्रे गोळा केले जात आहेत की काय असा आरोप काहीसा काही रहिवाशांनी केला होता त्यामुळे देखील बऱ्याचदा याविषयी वातावरण निर्माण झाले होते परंतु हे सर्व वातावरण दूर करून या प्रकल्पाला प्रगतीपथावर आणण्याचे काम शासनाने मोठ्या स्तरावर केलेले आहे .

वरच्या मजल्यावर रहिवाशांची शपथपत्रे घेऊन त्याचप्रमाणे 15 नोव्हेंबर 2022 पर्यंतच्या वरच्या मजल वरील सर्व निवासी सदनी धारकांना भाडेपट्टी योजनेअंतर्गत पात्र ठरवण्याचा निर्णय देखील मागच्या काही काळात घेण्यात आलेला आहे त्यामुळे देखील वर्ष मजल्यावर रहिवाशांना एक दिलासा मिळालेला आहे त्या अंतर्गतच त्यांच्या असणारी शपथपत्रे गोळा करून त्यांच्या पुनर्वसनाचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे तसेच शपथपत्राबरोबर त्यांना विविध कागदपत्र जसे की वीज बिल, आधार रेशन, मजला क्रमांक यांसारखी मार्ग देखील खुले करण्यात आलेले आहेत.

खर तर धारावी पुनर्विकास प्रकल्पाला मागच्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात वेग मिळालेला आहे त्यामुळे मुंबईतील विविध जागांची मागणी ही या पुनर्विकास प्रकल्पासाठी केली जात आहे मुलुंड मधील काही भाग त्याचप्रमाणे ही देवनारची कचरा भूमी याचा देखील त्यात समावेश केला आहे यावर मुलुंड मधील सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट सागर देवरे हे सध्याला शिवसेना ठाकरे पक्षाचे आहेत त्यांनी या गोष्टीवर आक्षेप घेतलेला आहे तसेच केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमावलीनुसार घोषित केलेले या जागेवर पुढील पंधरा वर्षे कुठलीही बांधकाम करू नये त्याचप्रमाणे संबंधित एरिया हा बफर झोन म्हणून घोषित करावा यासंबंधीची नोटीस त्यांनी महानगरपालिकेला पाठवलेली आहे व हा राज्य शासनाने देऊ केलेल्या 124 एकर जागेचा निर्णय रद्द करावा हे देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे .

मुंबईतील प्रदूषणाची समस्या

मुंबई दर दिवशी मोठ्या प्रमाणात कचरा हा निर्माण होतो शहरातील रहिवासी त्याचप्रमाणे व्यावसायिक अशा दोन्हीही माध्यमातून मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे निर्मिती होते त्यामुळे मुलुंड कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राउंड वर मोठ्या प्रमाणात दर दिवशी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया ही सुरू असते. खरंतर पर्यावरण नागरिक आणि नागरिकांचे आरोग्य या तिन्ही गोष्टीचा योग्य प्रकारे संगम करून केवळ प्रशासनानेच नव्हे तर नागरिकांनी देखील आपल्या जबाबदारीचे भान ठेवून मुंबईत निर्माण होणारी प्रदूषण असे समस्या देखील थांबवली पाहिजे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top