कांदळवणाची कत्तल करणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश | Orders To File Case Against Those Who Cut Kandalwan

कांदळवणाची कत्तल करणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आहे.

कांदळवणाची कत्तल करणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
Image credits – pixabay

मुंबई शहरातील अंधेरी भागातील लोखंडवाला येथील बॅक रोड परिसरातील कांदळवणाची कत्तल करून बेकायदेशीररित्या भराव टाकणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हे पाहणी दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या या कांदळपणाचा मुद्दा हा पावसाळी अधिवेशनात उपस्थित झालेला होता शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेतील लक्षवेधी सूचनाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केलेला होता

कांदळवणाची कत्तल करणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या या लक्षवेधी सूचनाच्या माध्यमातून त्यांनी या कांदळवाणाचा प्रश्न हा उपस्थित केलेला होता अधिवेशन समताच त्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी या कांदळ वनावर होत असलेला कत्तली संदर्भातील दखल घेऊन घटनास्थळी जाऊन पाहणी केली या पाहणी दरम्यान त्यांनी या बेकायदेशीर भराव टाकणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले तसेच बफर झोनमधील परवानगी नसताना देखील भराव टाकण्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी यावेळेस नाराजी व्यक्त केली तसेच ही जागा काही वर्षांपूर्वी ना विकास क्षेत्रामध्ये होती परंतु ही जागा विकास क्षेत्रात कशी आली या संदर्भातील देखील विचारण्यात येणे यावेळेस अधिकाऱ्यांना केली तसेच बफर झोन मधील कुठली परवानगी नसताना भराव टाकण्याचे काम कसे झाले व या संबंधित योग्य ती चौकशी करण्याचे आदेश देखील त्यांनी यावेळेस अधिकाऱ्यांना दिले .

कांदळवण हे खरं तर जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून असणारा महत्त्वाचा घटक आहे खाऱ्या पाण्यात तक धरणारी ही वनस्पती भरती ओहोटीच्या काळात देखील तग धरून पाण्यात उभी असते त्यामुळे जैवविविधतेचा अनन्यसाधारण असं महत्त्व आहे परंतु मुंबई शहरात झालेल्या विकासामुळे तसेच झपाट्याने झालेल्या औद्योगीकरण तसेच शहरीकरणामुळे या कांदळवणाच्या वाढीवर असा परिणाम झाला परिणामी यांच्यावर बेकायदेशीर रित्या कत्तल करून भराव टाकण्याची प्रयत्नच केली तर मागच्या काळात झाले परंतु बऱ्याचदा या प्रकरणावर दुर्लक्ष झाले परंतु विधान परिषदेच्या या अधिवेशनात याविषयी मुद्दे उपस्थित झालेले यावर सर्वांचे लक्ष झाले तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश देखील पंकजा मुंडे यांनी दिले याच महिन्यातील 26 जुलै च्या तारखेला आंतरराष्ट्रीय कांदळवन दिन म्हणून देखील साजरा केला जातो जंगलाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी हा दिवस साजरा केला जातो परंतु त्याच्याच काही दिवस अगोदर या परिसरात बेकायदेशीर रित्या भराव टाकले गेल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे होत आहे हा भराव काढून टाकून तेथे कांदळवणाचे पुन्हा प्रस्थापित करण्याची निर्देश देखील यावेळेस त्यांनी दिले.

शहरातील असणे या कांदळवणाची कत्तल करून मोठ्या प्रमाणात त्यावर अतिक्रमण होत असल्याचे तक्रारी सध्याला शहरात वाढत आहेत या सर्व तक्रारींचे संकलन करून त्या संदर्भात गंभीर दखल घेऊन दोशींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची निर्देश देखील या वेळेस श्रीमती मुंडे यांनी दिलेले आहेत तसेच ज्या भागात मोठ्या प्रमाणात या जैवविविधतेने नटलेल्या वनस्पतींवर अतिक्रमण झालेले आहे ते लवकरात लवकर हटवून त्या ठिकाणी त्यांचे पुन्हा प्रस्थापित व्हावे असे इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे.

यावेळेस पावसाळी अधिवेशन हे विविध कारणांनी चर्चेत आलेला आहे सत्ताधारी आणि विरोधक यांच्या प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात विविध प्रश्नांना हात घातला गेलेला आहे मुंबई शहरातील निर्माण झालेली या समस्याला देखील या अधिवेशनात यादरम्यान वाचा फोडली गेलेली आहे तसेच यावर तात्काळ कारवाई देखील झालेली आहे .

मुंबई शहरातील पहाडी गोरेगाव परिसरात कांदळवणाची पाहणी दौऱ्या दरम्यान शिवसेनेचे आमदार अनिल परब त्याचबरोबर पर्यावरण सचिव जयश्री भोज आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव अविनाश ढाकणे देखील यावेळेस उपस्थित होते त्याचवेळी या बफरचून मधील विनापरवानाधारक भराव टाकण्याचे कृती यावेळी समोर आली या संपूर्ण प्रकरणाची पर्यावरण खात्याने त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी देखील गंभीर दखल ही घेतलेली आहे त्यामुळे या संदर्भात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची आदेश देखील यावेळेस पंकजा मुंडे यांनी दिलेले आहेत खरंतर मुंबई शहरातील सर्व परिसर हा भौगोलिक दृष्ट्या जैवविविधतेने नटलेला आहे त्यामुळे खाऱ्या पाण्यात उगवणारा या कांदळवणाची अनन्यसाधारण महत्त्व असे या भौगोलिक दृष्ट्या असणाऱ्या जैवविविधतेचे महत्त्वाचे आहे त्यामुळे भविष्यात ज्या ठिकाणी हे जैवविविधतेने वनस्पती आहेत त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही यासंदर्भात काळजी घेण्याची आदेश तसेच आवाहन देखील या वेळेस श्रीमती मुंडे यांनी दिलेले आहेत .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top