पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत भारतामध्ये प्रथमच जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन परिषदेचा आयोजन करण्यात आलेला आहे या परिषदेच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहेत.

या वेव्हज अर्थात जागतिक ऑडिओ व्हिज्युअल अँड मनोरंजन परिषदेत आयोजन हे जिओ वर्ल्ड सेंटर येथे करण्यात आलेल आहे याच्या उद्घाटन प्रसंगी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहे त्यांच्या या दौऱ्या वेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परराष्ट्र मंत्री एस जय शंकर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व अजित दादा पवार हे देखील यावेळी उपस्थित राहणार आहे तसेच महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार व उद्योग मंत्री उदय सामंत देखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत
वेव्हज या परिषदेचे यजमान पद सध्याला मुंबईकडे आहे . मुंबईत होत असलेल्या या परिषदेत मनोरंजन व मीडिया क्षेत्रातील जागतिक स्तरावरील विविध प्रतिनिधी हे सामील होणार आहेत त्यामुळे नवनवीन संकल्पना तसेच विविध गोष्टींवर या परिषदेत चर्चा होणार आहे.
या परिषदेमध्ये 90 पेक्षा जास्त देश दहा हजार पेक्षा जास्त प्रतिनिधी 1000 कलाकार साडेतीनशे स्टार्टअप व 300 कंपन्या या सहभागी होणार आहे त्यामुळे जागतिक पातळीवर या परिषदेमार्फत मनोरंजन हा मीडिया क्षेत्राला आकर्षित करण्यासाठी तथा मनोरंजन क्षेत्रातील विविध गोष्टींसाठी या परिषदेचा आयोजन करण्यात आलेला आहे.
चार दिवस असणाऱ्या परिषदेत कनेक्टिंग क्रियेटर कनेक्टिंग कंट्रीज या घोषवाक्य अंतर्गत जागतिक स्तरावरील विविध क्रिएटर आणि देशांना या परिषदेत या डायलॉग अंतर्गत एकत्रित येण्याचा आमंत्रण हे दिलेल आहे खर तर आजचं नवयुग हे चित्रपट ओटीपी तसेच गेमिंग प्लॅटफॉर्म डिजिटल मीडिया व नवनवीन तंत्रज्ञानाने दर दिवशी हे अपडेट होत असतं त्यामुळे याच विविध नवीन तंत्रज्ञानाचा त्याचबरोबर चित्रपट ओटीटी डिजिटल मीडिया ब्रॉडकास्टिंग या सर्वांचा समावेश या परिषदेत करण्यात आलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत या कार्यक्रमात विविध कलाकारांचे देखील संवाद साधणार आहेत क्रिकेट इन इंडिया अंतर्गत निवडलेल्या विविध कलाकारांशी संवाद यावेळी पंतप्रधान साधणार आहेत तसेच भारत पवेलियन आणि महाराष्ट्र पवेलियन यांना देखील यावेळी भेट देणार आहेत ग्लोबल मीडिया डायलॉग याचे शिखर परिषदेमार्फत होणार आयोजन यात 25 देशाचे मंत्री सहभागी होणार आहेत त्यामुळे जागतिक पातळीचा हा कार्यक्रम निश्चितच मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध कलाकारांना तसेच विविध लोकांना निश्चितच प्रोत्साहित करणार आहे असे सांगण्यात येत आहे.
या शिखर संमेलनात 42 मुख्य सत्रे 39 विशेष सत्र आणि 32 मास्टर क्लास याच्या आयोजन करण्यात आलेले आहे तसेच विविध संकल्पना ब्रॉडकास्टिंग चित्रपट यासंबंधीच्या विविध गोष्टींविषयी देखील यातच चर्चा होणार आहे खरं तर मुंबईला चित्रपट किंवा सिने सृष्टीचा प्रदीर्घ असा वारसा आहे मुंबईतील या चित्रपट नगरीमुळे दर दिवशी हजारो लाखो लोकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतात त्याचप्रमाणे शहराच्या व राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो .
या परिषदेमार्फत 2029 पर्यंत 50 अब्ज डॉलर बाजारपेठांचे दार हे विविध मनोरंजन क्षेत्रात उघडले जातील असा अंदाज विविध अभ्यास व्यक्त करत आहे जागतिक पातळीवरील कलाकारांना एकत्र आणून या परिषदेमार्फत एक अनोखा व वेगळा उपक्रम हा राबवला जात आहे. मनोरंजन क्षेत्राचा अर्थकारण हे अतिशय वेगळं असतं मनोरंजन विश्व हे विशाल आहे त्यामुळे जागतिक पातळीवरील कला क्षेत्रात अनन्यसाधारण असे योगदान असणारे विविध लोक या परिषदेमार्फत एकत्र येणार आहे.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर मध्ये या परिषदेचे आयोजन हे करण्यात आलेला आहे या परिषदेविषयी मागच्याच काही दिवसांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अश्विनी वैष्णव यांच्या झालेला संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते चार दिवस होणारी ही परिषद कला क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना निश्चितच प्रेरणा देणारी ठरणार आहे भारताचे सिनेसृष्टी ही खरंतर विविधतेने नटलेली आहे त्यामुळे ज्या प्रत्येक स्तरावरील या ऑडिओ व्हिडिओ व मनोरंजन परिषदेमार्फत निश्चितच मोठ्या प्रमाणात नवनवीन संकल्पना तसेच तंत्रज्ञानाच्या विषयी विविध गोष्टी यापुढे येऊन भविष्यात त्याचा फायदा निश्चितच या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे .
या दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील भारत पवेलियन व महाराष्ट्र पविलियन यांना देखील भेट देणार आहेत तसेच क्रिएट इन इंडिया या उपक्रमांतर्गत निवडलेल्या कलाकारांशी देखील संवाद साधणार आहेमुंबईत होणारी ही व्यवस्था परिषद याकडे मनोरंजन क्षेत्रातील एक गेम चेंजर परिषद म्हणून बघितलं जात आहे .