मुंबईत घर घेणे होणार स्वस्त ! म्हाडा लवकरच मोठ्या निर्णयाच्या तयारीत | Mhada Houses Mumbai

मुंबईत घर घेणे होणार स्वस्त म्हाडा लवकरच मोठ्या निर्णयाच्या तयारीत मुंबईत आजकाल जमिनीचे व घराचे दर हे उच्चांक पातळी गाठत आहे सध्याला सर्वसामान्य लोकांना मुंबईत घर घेण्याचा विचार हा त्यांच्या बाबा क्या बाहेर जात आहे वाढत्या घरांची किंमत ही सर्वसामान्य लोकांना परवडत नाही आहे अशा स्थितीत सर्वसामान्य लोकांना परवडणाऱ्या किमतीत घर उपलब्ध व्हावी यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. मुंबईतील रिअल इस्टेट मार्केट हे त्यामानाने महागडे मानलं जातं.

सर्वसामान्य लोकांसाठी म्हाडा लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Image credits – pixabay

म्हाडा लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

म्हाडा अर्थात महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी दरवर्षी विविध घरांचे सोडत काढत असते परंतु म्हाडाच्या घराच्या किमती देखील आजकाल वाढतच आलेला आहे या किमती सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा स्थितीत त्यांच्या किमती सर्वसामान्य लोकांना परवडेल अशा स्थितीत आणण्यासाठी सध्याला शासनाने त्रि सदस्य समिती ही नेमली आहे ही समिती घरांच्या किमती या निश्चित करण्याबाबत अभ्यास करून याचा अहवाल हा म्हाडाच्या उपाध्यक्षांकडे सादर करण्यात आहेत व हा आवाहन पुढे शासनाकडे पाठविण्यात येणार आहे .

खरंतर सर्वसामान्य लोकांना मुंबईत घर असण्यासाठी म्हाडा सारख्या संस्थेकडे खूप अशाने पाहिलं जातं परंतु याच घराच्या किमती या गगनाला भिडत चाललेल्या आहेत त्यामुळे याचा फटका बऱ्याचदा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे .

मुंबई उपनगरातील किंवा ठाणे परासरातील घरांच्या किमती या सर्वसामान्य लोकांना परवडतात परंतु तेवढ्यात क्षेत्रफळाची घरे ही जर मुंबईतील साउथ मुंबई सारख्या भागात असतील तर याची किंमत किती तरी पटीने जास्त असते त्यामुळे क्षेत्रफळ ऐवजी किमतीनुसार गट पडावा असा देखील विचार करावा असे विविध स्तरातून सांगितले जात आहेत सध्याला खालील प्रमाणे गट हे पाडले जातात.

घरांचा क्षेत्रफळानुसार गट आखलेले वर्ग
300 चौरस फूटअत्यल्प
साडेचारशे चौरस फूटअल्प
600 चौरस फूटमध्यम
900 चौरस फूटउच्च

या घराची किंमत ही विविध निकषांच्या आधारे ठरविले जाते बांधकामाचा खर्च, भूखंडाचा खर्च ,त्याचप्रमाणे लागणारे विविध आस्थापनाचा खर्च या सर्व गोष्टींचा विचार करून या घरांची किंमत ठरवली जाते व या अनुरूप विविध गटांकडून म्हणजेच अत्यल्प आणि अल्प गटाकडून झिरो टक्के नफा तर मध्यम गटाकडून दहा टक्के तर उच्च गटाकडून 15 टक्के नफा घेतला जातो व त्या अनुरूप घरांची सोडत केली जातेखरंतर एखादा भूखंड ज्यावेळेस म्हाडाच्या अंतर्गत येतो किंवा बऱ्याचदा हा भूखंड जर खूप वर्ष तसाच पडून राहिला तर या भूखंडाच्या सुरक्षिततेची व त्यावर लागणारे विविध खर्चाची किंमत देखील बांधण्यात येणाऱ्या घरांच्या खर्चामध्ये ऍड करून घरांची किंमत ही ठरवली जाते त्यामुळे अशा स्थितीत देखील घरांची किंमत ही वाढते त्यामुळे याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना पडतो त्यामुळे याचा देखील विचार हा घरांच्या किमती ठरवताना केला पाहिजे असे देखील सांगण्यात येत आहे.

किमती संदर्भात ठरवण्यात आलेली ही त्रि सदस्य समिती विविध गोष्टींचा अभ्यास करून घरांच्या किमती व त्यांचे निश्चिती करण्यासाठी विविध उपाय योजनांचा अभ्यास करून हा अहवाल म्हाडा समोर सादर करणार आहे

म्हाडांचा सर्वसामान्य नागरिकांसाठी जनता दरबार

नागरिकांच्या तक्रार निवारणासाठी जनता दरबारासारखा स्तुत्य उपक्रम सध्याला राबवत आहे या अंतर्गतच भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात 22 एप्रिल रोजी दुपारी बारा ते दोन या दरम्यान जनता दरबाराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम मिलिंद बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडणार आहे .

नागरिकांना असलेल्या विविध तक्रारींचे लेखी निवेदन हे 22 तारखेपर्यंत वांद्रे येथील म्हाडाच्या मुख्यालयातील तिसरा मजल्यावर कक्ष क्रमांक 408 मध्ये स्वीकारणार येण्यात आहे या जनता दरबारामुळे निश्चितच नागरिकांना हाउसिंग संबंधी असलेल्या विविध समस्यांचे निवारण होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे . जनता दरबार आणि निश्चितच नागरिकांना सामोरे जावे लागणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण त्यावर चर्चा व विविध अभ्यासकांची मत यामुळे मोठ्या प्रमाणात समस्यांचे निराकरण होण्यास मदत मिळणार आहे .

मुंबईत घरांच्या किमती का वाढत आहेत?

सध्याला मुंबईत मोठ्या प्रमाणात मोठ मोठ्याने प्रकल्प चालू आहेत त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मुंबईमधील रियल इस्टेट मध्ये मोठ्या प्रमाणात व झपाट्याने वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहेत मुंबईतील लोकनेते डीबी आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढणार आहे त्याचप्रमाणे मुंबईत चालू असलेली मोठे प्रकल्प जसं की मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे, कोस्टल रोड असेच विविध मोठया प्रकल्प यामुळे देखील शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण आणि विकासाला चालना मिळणार आहे त्यामुळे देखील निश्चितच रियल इस्टेटच्या या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला बघायला मिळणार आहे .

2 thoughts on “मुंबईत घर घेणे होणार स्वस्त ! म्हाडा लवकरच मोठ्या निर्णयाच्या तयारीत | Mhada Houses Mumbai”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top