क्रॉफर्ड भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत मच्छीमार संघटनेने आजाद मैदान येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेल आहे.

क्रॉफर्ड मार्केट मधील पलटण रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडळ येथील मासळी विक्रेत्यांचे पुनर्वसन महात्मा ज्योतिबा फुले मंडई येथे करण्याचा निर्णय झालेला होता परंतु या क्रॉफर्ड भूखंड लिलाव प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप मच्छीमार संघटनेने केलेला आहे त्यामुळे हे छत्रपती शिवाजी महाराज मासाळी मंडळीचा भूखंड सध्याला वादात सापडलेला आहे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने या प्रकरणात लक्ष घातलेले आहे तसेच या संबंधित चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे.
क्रॉफर्ड भूखंड लिलावा संदर्भात मच्छिमार संघटनेने पोलिसात केली तक्रार
क्रॉफर्ड भूखंड लिलाव प्रक्रियेत घोटाळा झाला चा आरोप करत महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तोंडेल यांनी केलेला आहे हा भूखंड एका कंपनीला 369 कोटी रुपयांनी तीस वर्षाच्या भाडे करारावर देण्यात आलेला आहे या व्यवहारा संदर्भात त्यांनी गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केलेला आहे तसेच मुंबईतील पारंपारिक कोळी बांधव व मच्छीमार व्यवसायांना नष्ट करण्यासाठी डाव हा मुंबई महानगरपालिकेत आहे असा आरोप देखील त्यांनी यावेळेस केलेला आहे तसेच या समितीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे तक्रार देखील दाखल केलेली आहे तसेच सदर प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून कंपनीला दिलेला लओआय आहे देखील रद्द करण्याची मागणी यावेळेस निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
मुंबई शहरातील आझाद मैदान पोलीस ठाणे मध्ये या संदर्भातील तक्रार देखील दाखल केलेली आहे तसेच या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी देखील यावेळेस संघटनेने केलेला आहे कारण हजारो मासेमारी विक्रेत्यांचे भवितव्य या निर्णयावर अवलंबून आहे जर हा प्रश्न वेळप्रसंगी मार्गी नाही लागल्यास या संदर्भात मोर्चा देखील काढण्यात येईल असे देखील या वेळेस कृती समितीने इशारा दिलेला आहे तसेच या मोर्चामध्ये शहरातील 25 हजार कोळी व मच्छीमार विक्रेते सहभागी होतील.
मुंबईतील पारंपारिक तसेच पिढ्यानुपीडिया मासेमारी व्यवसाय करणाऱ्या बांधवांच्या व्यवसाय नष्ट करण्यासाठी चा घाट हा या लिलाव प्रक्रियेमुळे घातला गेलेला आहे असे सांगत या निर्णयाला मच्छीमार संघटनेने विरोध केलेला आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराज मासाळी विक्रेत्यांचे पुनर्वसन हे महात्मा ज्योतिबा फुले मंडई येथे करण्यात येणार असलेली ही जागा देखील अपुरी पडत असल्याचा दावा देखील या वेळेस या संघटनांनी केलेला आहे ही जागा मासेमारी विक्रेत्यांसाठी पुरेशी नाही असे देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केलेले आहे .
मुंबई महानगरपालिकेने महसूल वाढवण्यासाठी दोन भूखंडाची लिलाव प्रक्रियेने विक्री करण्याचा निर्णय हा घेतलेला होता त्यात क्रॉफर्ड मार्केट मधील हे छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई आणि वरळी येथील अस्फाल्ट फ्लॅटचे जागा होती त्यातील हा पहिला असलेला भूखंड यासंदर्भात गैरव्यवहार झाल्याचा संशय यावेळी मच्छिमार संघटनांनी व्यक्त केला तसेच या क्रॉफर्ड भूखंड लिलाव प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी व यासंदर्भातील तक्रार देखील आझाद मैदान पोलीस ठाणे येथे करण्यात आलेली आहे.
या क्रॉफर्ड भूखंड अंतर्गत येणाऱ्या मासळी मंडईच्या भूखंडाची रक्कम ही 2175 कोटी रुपयांवरून 629 कोटी कशी करण्यात आली व प्रत्यक्ष विक्रीवेळी ही रक्कम 369 कोटी कशी करण्यात आली यासंदर्भातील आक्षेप यावेळी घेण्यात आलेला आहे तसेच या क्रॉफर्ड भूखंड विक्रीसाठी मुंबई महानगरपालिकेने काही अटी ठेवलेल्या होत्या परंतु या अटींचा देखील या लिलाव प्रक्रियेमुळे भंग झाल्याचा आरोप देखील या वेळेस देवेंद्र तांडेल यांनी केलेला आहे तसेच ज्या कंपनीची स्थापना ही केवळ 2023 ला झालेली असून ज्यांची वार्षिक उलाढाल ही केवळ 500 कोटी इतकी असताना या कंपनीला एवढा मोठा भूखंड कसा बहाल केला या संदर्भात देखील त्यांनी संशय हा व्यक्त केलेला आहेया संपूर्ण प्रकरणात त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे अशी विनंती देखील केलेली आहे तसेच जर या संदर्भात कुठलाही निर्णय झाला नाही तर 23 जुलै रोजी मोठा जन आक्रोश मोर्चा हा मुंबईत होणार असल्याचे देखील यावेळेस मच्छीमार संघटनांनी सांगितले तसेच या मोर्चात हजारो मच्छीमार सहभागी होतील असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
मच्छीमार संघटनेने केलेल्या या घोषणेवर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर महानगरपालिकेच्या आयुक्त भूषण गगराणी तसेच पालिका प्रशासन काही निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
