केईएम हॉस्पिटल हे खरंतर मुंबईतील सगळ्यात नावाजलेले रुग्णालय मानलं जातं याच रुग्णालयात आता खेळाडूंसाठी व खेळाडूंच्या उपचारासाठी स्वतंत्र विभाग उभारण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे भारत हा देश नव तरुणांचा देश आहे खेळात आपले करिअर आजमावू पाहणाऱ्या खेळाडूंची संख्या हे आपल्याकडे प्रचंड प्रमाणात आहे परंतु बऱ्याचदा त्यांच्यासाठी सोयी सुविधांच्या अभाव आपल्याला बघायला मिळतो अशा स्थितीत केईएम हॉस्पिटलमध्ये खेळाडूंच्या उपचारासाठी स्वतंत्र विभागाचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे.

केईएम हॉस्पिटल मध्ये खेळाडूंसाठी स्वतंत्र विभागाची उभारणी
मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते केईएम हॉस्पिटल मधील या स्वतंत्र विभागाचे भूमिपूजन करण्यात आले हा विभाग रुग्णालयाच्या बाराव्या मजल्यावर साधारणतः 15000 चौरस फूट जागेत या विभागाची उभारणी करण्यात येणार आहे यासाठी साधारणतः 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे असे सांगण्यात आलेले आहे .
या भूमिपूजनाच्या कार्यक्रमा वेळी विविध मान्यवर उपस्थित होते त्यात मुंबई बीएमसी आयुक्त भूषण गगराणी तसेच पालिकेचे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त त्याचप्रमाणे केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर संगीता रावत तसेच रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर व प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.
के एम हॉस्पिटल मध्ये खेळाडूंना मिळणार स्वतंत्र उपचार
खेळाडूंसाठी बांधण्यात येणाऱ्या या स्वतंत्र विभागात क्रीडापटूंच्या दुखापती बरोबरच तसेच त्यांच्या पुनर्वसन केंद्र व संशोधन केंद्र अशा विविध विभागांचा या अंतर्गत समावेश केला जाणार आहे त्यामुळे नुसतच खेळाडूंचे उपचारासाठी नव्हे तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी देखील उभारण्यात येणारे हे केंद्र हे महत्त्वाचे मानले जात आहे खेळाडूंसाठी बांधण्यात येणारा हा स्वतंत्र विभाग हा पश्चिम भारतातील एकमेव असे केंद्र ठरणार आहे जे खेळाडूंची उपसारासाठी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देणारे आहे.
कुठलाही खेळ खेळताना निश्चितच खेळाडू हे त्यांचा सर्वस्व प्रदान करतात अशावेळी बऱ्याचदा खेळाडूंना विविध दुखापतींना सामोरे जावे लागते बऱ्याचदा खेळताना पडणे लागणे एखादी जखम होणे किंवा हाडांवर मुक्कामार बसणे यांसारखे विविध समस्या या खेळाडूंना जाणवतात बऱ्याचदा खेळांनुरूप होणाऱ्या दुखापती देखील बदलतात खेळाडूंना होणाऱ्या दुखापतींवर उपचारासाठी नेहमीच खाजगी रुग्णालयांकडेच प्राधान्याने जावं लागत असेल अशा स्थितीत बऱ्याचदा खर्चाचे प्रमाण देखील आवक्या बाहेर जायचे त्यामुळे अशा स्थितीत खेळाडूंना अतिशय माफक दरात उपचार करून देण्यासाठी उभारण्यात येणारे या विभागामुळे निश्चितच मदत मिळणार आहे.
केवळ खेळाडूंवर झालेला दुखापतींवर उपचारच नव्हे तर त्यांच्या पुनर्वसनासाठी देखील या विभागात याची स्वतंत्र व्यवस्था आहे त्याचबरोबर विविध संशोधन केंद्र याचे देखील स्थापना यात केलेली आहे त्यामुळे केईएम हॉस्पिटल मधील या विभागाकडे एक चांगला उपक्रम म्हणून पाहिले जात आहे .
केईएम हॉस्पिटल मधील या खेळाडूंच्या स्वतंत्र विभागासाठी बालकृष्ण इंडस्ट्रीज यांच्याकडून देखील सहकार्य मिळणार आहे अत्याधुनिक सुविधा नियुक्त असलेले हे केंद्र निश्चितच खेळाडूंना त्यांच्या उपचारासाठी सहकार्य करणारे ठरणार आहे मुंबई हे शहर विविध खेळाचे हब मानले जाते मुंबईला क्रिकेटचा मोठा वारसा आहे त्याचप्रमाणे मुंबई मोठ्या प्रमाणात विविध खेळ खेळले जातात त्यामुळे निश्चितच खेळाडूंसाठी उभारण्यात येणाऱ्या या केंद्रामुळे खेळाडूंना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे.
मुंबईत खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी विविध क्रीडा अकॅडमी या आहेत प्रामुख्याने क्रिकेट फुटबॉल कबड्डी तसेच विविध अशा आणि खेळांसाठी देखील मोठ्या प्रमाणात सुविधा या मुंबई शहरात उपलब्ध आहेत त्यामुळे उभारण्यात येणाऱ्या या केंद्रामुळे त्यांना निश्चितच त्यांच्या दुखापतीवर चांगले उपचार मिळणार आहेत . केईएम हॉस्पिटल हे मुंबई शहरातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित व मोठे रुग्णालय आहे मल्टी स्पेशलिस्ट अर्थात सर्व सोयी सुविधा नियुक्त असलेले हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी निश्चितच एक आशेचा किरण म्हणून पाहिला जातो मुंबईतील परळ भागातील आचार्य दोंदे मार्गावर हे रुग्णालय आहे तसेच मागच्याच काही दिवसांमध्ये मुंबईतील जे जे रुग्णालयात रोबोटिक्सने पहिली सर्जरी पार पडली या सर्जरीची मोठ्या प्रमाणात स्तुती ही विविध क्षेत्रातून करण्यात आली कारण शासकीय रुग्णालयातून रोबोटिक सारख्या उच्च तंत्रज्ञानाचा देखील रुग्णांना फायदा मिळत आहे .
राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी शासन नेहमीच विविध उपक्रम हे राबवत असतं खेळाडूंना खेळात प्रोत्साहित करून खेळतांनी चांगलं नावलौकिक कराव परिणामी राज्य व देशाचे नाव मोठं करावं यासाठी शासन विविध स्तरातून खेळाडूंसाठी चांगले प्रयत्न करत असते जागतिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या विविध खेळांमध्ये आपल्या देशाचं नाव मोठं व्हावं तसेच शिक्षणाबरोबरच मैदानी खेळांच्या माध्यमातून नवीन पिढींमध्ये खेळाडू वृत्ती निर्माण व्हावी परिणामी सर्वांगीण विकास व्हावा यासाठी खेळ व खेळाचे महत्व देखील अधोरेखित करण्यास विविध स्तरातून नेहमीच प्रयत्न केले जातात त्यामुळे उभारण्यात येणारी या स्वतंत्र्य विभागामुळे निश्चितच त्यात हातभार लागणार आहे