मुंबईत साकारला जाणार टाऊन हॉल जिमखानामहानगरपालिकेच्या क्रीडा भवनाच्या जागेवर या टाऊन हॉल जिमखानाच्या उभारणीचा प्रस्ताव किंवा संबंधित संकल्पना मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गंगराणी यांच्या संकल्पनेतून होणार आहे हा टाऊन हॉल खूप भव्य दिव्य असणार आहे दैदीप्यमान अशा उभ्या राहणाऱ्या टाऊन हॉलमध्ये विविध प्रकारच्या सुविधा या उपलब्ध असणार आहे.

मुंबईतील ऐतिहासिक वारसा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय यांच्या शेजारी असणाऱ्या क्रीडा संकुलनाच्या जागेवर हे भव्य दिव्य टाऊन हॉल जिमखाना उभारण्यात येणार आहे यामध्ये प्रामुख्याने व्हिवींग गॅलरी, काचेचा भव्य दिव्य असा घुमट तसेच कॅप्सूल लिफ्ट आणि रूट ऑफ यांसारख्या सुविधा उपलब्ध असणार आहे त्यामुळे निश्चितच पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा हा उपक्रम म्हणून बघितला जात आहे.
मुंबईत साकारला जाणार टाऊन हॉल जिमखाना
या टाऊन हॉल जिमखानाची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे यामध्ये प्रामुख्याने तळमजला ते पाच मजले अशा प्रकारची रचना असून यामध्ये वाहनांच्या पार्किंगसाठी देखील व्यवस्था असल्याचे सांगण्यात आलेले आहे साठ वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असणारे दोन तळघर देखील बांधले जाणार आहे त्यामुळे भेट देणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची देखील सोय यात केली जाणार आहे.
सध्या उभा असलेला क्रीडा भवन हे महालक्ष्मी रेस कोर्स जवळील तुळशी वाडी येथे उभारण्याचा प्रस्ताव सादर केलेला आहे जुन्या रेस कोर्स मध्ये कर्मचाऱ्यांना म्हणावे तितक्या सोयी सुविधा या उपलब्ध नव्हत्या त्यामुळे बऱ्याचदा कर्मचाऱ्यांना या क्रीडा संकुलनाचा तितकाचा फायदा होत नव्हता त्यामुळे देखील बऱ्याचदा क्रीडा संकुलन सुविधांचे अभावी तसेच राहिले त्यामुळे कर्मचाऱ्यांना सहज उपलब्ध होईल अशा स्थितीचं नवीन क्रीडा संकुलन हे बांधण्याचे निर्णय देखील घेण्यात आलेला आहे महालक्ष्मी रेस कोर्स जवळील तुळशीवाडी येथे हे क्रीडा संकुलन बांधण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे यामध्ये प्रामुख्याने विविध सोयी सुविधा या उपलब्ध असणार आहे बॅडमिंटन, टेबल टेनिस पोहण्यासाठी स्विमिंग पूल, जिम यांसारख्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले हे संकलन कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच फायद्याचा ठरणार आहे.
महालक्ष्मी रेस कोर्स जवळील तुळशी वाडी येथे उभारण्यात येणार हे क्रीडा संकुलन कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून एका चांगल्या जागेवर आहे त्यामुळे निश्चितच विविध भागातील कर्मचाऱ्यांना या क्रीडा संकुलनाचा फायदा असाच होणार आहे या क्रीडा संकुलनाला चांगल्या प्रकारची वाहतूक कनेक्टिव्हिटी या असल्यामुळे विविध कर्मचाऱ्यांनी फायदा घेऊ शकणार आहे .
मुंबई शहरात उभारण्यात येणारी या टाऊन हॉल जिमखाना हे बीएमसी अर्थात महानगरपालिकेच्या क्रीडा भवनातील जागेचा पुनर्विकास करून उभारण्यात येणार आहे या हॉलच्या शेजारी विविध ऐतिहासिक वारसा असलेले तसेच पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय आहे त्यामुळे उभारण्यात येणारे या टाऊन हॉलमुळे पर्यटनामध्ये निश्चितच भर पडण्यास मदत मिळणार आहे.
या टाऊन हॉल ची रचना देखील वैशिष्ट्य पूर्ण आहे यामध्ये नागरिकांसाठी व्हिविंग गॅलरीमध्ये पोहोचण्यासाठी कॅप्सूल लिफ्ट तसेच रूफ टॉप यांसारख्या सुविधा देखील उपलब्ध आहे तसेच या हॉलचा उपयोग हा विविध सामाजिक कार्यक्रमांसाठी त्याचप्रमाणे सार्वजनिक सभा तसेच विविध सामाजिक उपक्रमांसाठी याचे उपलब्ध हे निश्चितच फायदेशीर ठरणार आहे.
दर दिवशी हजार रुपये टक्के मुंबईला भेट देतात पर्यटकांचे मुख्य आकर्षण असणारे विविध वास्तू स्थळ ही मुंबई शहरात अस्तित आहेत त्यातच उभारण्यात येणारे या टाऊन हॉलमुळे पर्यटकांना आणखी एक वस्तू कलेचा नमुना बघायला मिळणार आहे उभारण्यात येणारा हा टाऊन हॉल हा मुंबईतील मुख्य रहदारी असणारे भागात असल्यामुळे देखील त्याचे महत्त्व हे खूप जास्त आहे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या संकल्पनेतून या टाऊन हॉलची उभारणी करण्यात येणार आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स हे जागतिक पातळीवरचं एक ऐतिहासिक स्थळ आहे युनोस्को च्या जागतिक वारसा स्थळांमध्ये याचा समावेश आहे तसेच मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय अर्थातच मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे त्यामुळे देखील या दोन मुख्य आकर्षणाबरोबरच उभारण्यात येणार आहे टाऊन हॉल जिमखाना हे देखील पर्यटनाच्या आकर्षण पुढच्या काही काळामध्ये बनणार आहे.
महानगरपालिकेच्या क्रीडा भवनाच्या जागेवर होऊ घातलेल्या टाऊन हॉलमध्ये मुख्य आकर्षण असणाऱ्या व्हिवींग गॅलरीची व्यवस्था ही आहे या गॅलरीमुळे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात चांगल्या दृश्यांची मेजवानी हे बघायला मिळणार आहे या गॅलरीपर्यंत पोहोचण्यासाठी कॅप्सूल लिफ्टचे देखील व्यवस्था असणार आहे ज्याप्रमाणे मुंबईला भेट देणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण हे तर समुद्र असतो तसेच विविध वास्तुकाला देखील या पर्यटकांकडून पाहिल्या जातात त्यामुळे उभारण्यात येणाऱ्या या टाऊन हॉल जिमखानामुळ निश्चितच याचा फायदा हा पर्यटकांना होणार आहे.