हाजी अली ते परळ हे अंतर अवघ्या पाच मिनिटात आता गाठता येणार सर्वसामान्य मुंबईकरांना होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर करण्यासाठी शासनाने हाजीअली ते परळ या मार्गावर सहा पदरी उन्नत रस्ता बांधण्याचा प्रस्ताव केलेला आहे.

हाजी अली ते परळ अंतर्गत येणार अवघ्या पाच मिनिटात
मुंबईतील सागरी किनारा मार्ग हा परळशी जोडून पुढे हाजी अली ते परळ असा प्रवास सुसाट करण्यासाठी व हे अंतर अवघ्या पाच मिनिटात गाठता यावे यासाठी हा रस्ता खूप महत्त्वाचा ठरणार आहे हा रस्ता साधारणतः दीड किलोमीटर इतक्या लांबीचा आहे तसेच या प्रस्तावित रस्त्यासाठी साधारणतः 300 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे या हाजी अली ते परळ होणाऱ्या रस्त्यामुळे हाजी अली वरून परळ तसेच पुढे दादर माटुंगा माहीम यांच्याकडे जाणारी वाहतूक कोंडी यामुळे दूर होणार आहे बऱ्याचदा या मार्गावरून वाहनातून प्रवास करताना साधारणतः 30 मिनिट किंवा त्यापेक्षा च्या अधिक काळ वाहनांना लागतो.
अवघ्या काही अंतरावर जाण्यासाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो या प्रस्तावित परळ दरम्यान होणाऱ्या उन्नत मार्गामुळे ही वाहतूक कोंडी दूर होणार आहे सागरी किनारा मार्गामुळे प्रिन्सेस स्ट्रीट वरून हाजी अली वरळी आणि वांद्रे या मार्गांकडे जाणे सोपे होणार आहे तसेच वाहनांसाठी विविध पर्यायी मार्ग देखील यामुळे उपलब्ध होणार आहेत.
या हाजी अली ते परळ होणाऱ्या उन्नत मार्गासाठी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या बैठकीमध्ये बोलताना या रस्त्यासाठी कुठलेही भूसंपादन करण्याची गरज नाही असे देखील यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच या प्रस्तावित मार्गामुळे मुंबईच्या विविध भागांमध्ये होणारे वाहतूक कोणी देखील निश्चितच दूर होणार आहे.
हा उन्हात मार्ग साधारणतः दीड किलोमीटर अंतराचा आहे हा उन्नत रस्ता लाला लजपतराय रस्त्यावरील हाजी अली जंक्शन येथून महालक्ष्मी रेस कोर्सच्या बाजूने एन एस सी आय डोमजवळून पुढे सेनापती बापट मार्गावरील इमोसेस रोडच्या जवळ येऊन परळ येथे संपणार आहे त्यामुळे दीड किलोमीटरच्या या एकंदरीत प्रस्तावित रस्त्यामध्ये मुंबई शहरातील महत्त्वाची अशी ठिकाणे देखील यामुळे यात समाविष्ट होणार आहेत त्यामुळे वाहनांच्या प्रवासासाठी व वाहतूक कोंडीची वाढलेली समस्या दूर होण्यासाठी यामुळे निश्चितच मदत मिळणार आहे कारण बऱ्याचदा या रोडवर प्रवास करताना वाहनांना मोठ्या मार्गावरून वळसा घालत जावे लागायचे.
या प्रस्तावित हाजी अली ते परळ उन्नत रस्त्यासाठी सध्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने काम सुरू केलेले आहे दरम्यान यासाठी कुठलेही भूसंपादन देखील करावे लागणार नाही त्यामुळे देखील ही प्रक्रिया या प्रस्तावित रस्त्या संबंधित असणारी विविध कामे यामुळे निश्चितच लवकर होणार आहे दादर नरिमन पॉईंट तसेच या प्रस्तावित मार्गामुळे शहरातील विविध रस्ते आणि त्या भागांशी जोडणे यामुळे निश्चितच लवकर होणार आहे. या उन्हात रस्त्यामुळे सेनापती बापट मार्ग ते लाला लजपत राय मार्ग यांसारखे मुख्य प्रवाहात असणाऱ्या मार्गावरील वाहनांना आणखी एक रस्ता यामुळे मिळणार आहे या रस्त्यासाठीचा प्रस्ताव हा सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेला आहे तसेच या रस्त्याच्या कामाविषयी ची अंमलबजावणीची घोषणा ही अद्याप झालेली नाही तरीही हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारेच होणार असल्याचे कळत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या संपूर्ण प्रस्तावित उन्नती रस्त्याची चर्चा करण्यात आली तसेच या मार्गदरम्यान होणाऱ्या विविध मुद्द्यांचा देखील विचार यावेळी करण्यात आला भूसंपादनाचा कुठलाच विषय या प्रस्तावित रस्त्यासाठी येणार नसल्याने याचे काम देखील लवकरच पूर्ण होईल अशी आशा देखील यावेळी व्यक्त करण्यात आली सागरी किनारा मार्ग या प्रस्तावित उन्नत रस्त्याला जोडून घेणार आहे त्यामुळे देखील मुंबईतील सागरी किनारा मार्गावरील वाहतूक देखील यामुळे सुसाट होणार आहे.
हाजी अली ते परळ होउ घातलेला या प्रस्तावित रस्त्यामुळे वाहतूक तसेच वाहन चालकांचा प्रवास हा अति जलद होणार आहे हा प्रस्तावित रस्ता सहा पदरी आहे त्यामुळे हाजी अली पासून पुढे माटुंगा माहीम यांसारख्या भागाकडे जाणाऱ्या वाहनांना व प्रवाशांना याचा निश्चितच फायदा होणार आहे खरं तर मुंबईसारख्या शहरांमध्ये बऱ्याचदा पिकावर मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दीची समस्या ही जाणवते त्यामुळे बऱ्याचदा वाहनांच्या लांबच लांब रांगामुळे ट्रॅफिकची समस्या ही मोठ्या प्रमाणात उद्भवते तसेच या प्रस्तावित रस्त्यामुळे मुंबई शहरातील असणारी महत्त्वाची ठिकाणे या मार्गामुळे यात समाविष्ट होणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना याचा निश्चितच फायदा मिळणार आहे.