कांजूरमार्ग कचरा भूमीवर उच्च न्यायालयाने झालेल्या सुनावणीत टीका केली तसेच दाट लोकवस्ती असलेल्या भागात कचरा भूमी सुरू ठेवणे हे सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हीसाठी धोक्याचा असल्याचा सांगत तसेच या कचराभूमीमुळे होणाऱ्या विविध परिणामांचा त्यांच्या दीर्घकालीन परिणामांचा तसेच पर्यावरणीय दृष्ट्या देखील या संपूर्ण प्रकरणामुळे होणाऱ्या घटनांच्या संदर्भात व्यवस्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे देखील यावेळेस उच्च न्यायालयाने अधोरेखित केले.

कांजूरमार्ग कचरा भूमीवर उच्च न्यायालयाने केली टीका
मुंबई शहरातील कांजूरमार्ग कचरा भूमी ही खरंतर शहरातील मुख्यतः दाट वस्तीच्या भागात आहे त्यामुळे बऱ्याचदा या कचऱ्याच्या समस्यामुळे परिसरात धूळ व परिणामी प्रदूषण अशी समस्या असतात . अधिकार नसतानाही कांजूरमार्ग किनारा नियमन क्षेत्रातील ही जागा महानगरपालिकेला कचरा भूमीसाठी वापरण्यासंदर्भातील राज्य सरकारच्या मंजुरीला वनशक्ती या संस्थेने आवाहन केले. यासंदर्भात झालेल्या सुनावणी दरम्यान माननीय उच्च न्यायालयाने कांजूरमार्ग ही कचरा भूमी वापरण्यास साठी दिलेली परवानगी ही मे महिन्यातच रद्द केलेली होती व संबंधित कचरा भूमीसाठी नवीन जागा शोधण्यासाठी तीन महिन्याचे मुदत देखील यावेळी माननीय उच्च न्यायालयाने दिलेली होती.
मुंबई महानगर प्रदेशात एकात्मिक कचरा भूमीचा विचार व्हावा असे देखील न्यायालयाने सुचवले
कांजूरमार्ग या कचरा भूमी संदर्भातील सुनावणीवेळी न्यायालयाने म्हटले की महानगरपालिका तसेच मुंबई प्रदेश प्राधिकरणाने देखील कचऱ्यामुळे होणाऱ्या परिणामा संदर्भात गांभीर्याने विचार करत एखाद्या मानवी वस्ती पासून दूर असलेल्या एकात्मिक कचरा भूमीचा विचार करावा परिणामी या कचऱ्यामुळे मानवी वस्तीतील लोकांच्या आरोग्यावर तसेच पर्यावरणावर देखील याचा परिणाम होणार नाही कारण बऱ्याचदा कचऱ्याच्या या विल्हेवाटाच्या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात धूळ व प्रदूषण हे शहरात पसरते अशा स्थितीत मानवी वस्ती पासून कुठेतरी दूर अशा ठिकाणी या कचरा भूमी असाव्यात असे यावेळी न्यायालयाने नमूद केले.
कचरा भूमी संदर्भातील ही सुनावणी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर झाली वनशक्ती या संस्थेने दिलेल्या या आव्हानात या संबंधित उपरोक्त टीका करताना कचरासाठी एकात्मिक जागेचा विचार व्हावा असे यावेळी न्यायालयाने सुचवले खरंतर एमएमआर हा प्रदेश खूप मोठा आहे त्यामुळे दर दिवशी मोठ्या प्रमाणात कचरा हा शहरात तसेच शहरातील इतर भागात हा जमा होतो त्यामुळे या कचऱ्याची विल्हेवाट मानवी आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हीचा विचार करून चांगल्या रीतीने झाली पाहिजे अशी व्यवस्था करण्यात यावी परिणामी पर्यावरण आणि आरोग्य या दोन्हीही गोष्टींना यासाठीच कसा त्रास होणार नाही.
मुंबई शहरात सध्याला विविध ठिकाणी डम्पिंग ग्राउंड आहेत कांजूरमार्ग देवनार यांसारख्या कचऱ्या भूमिती व्यवस्थापन हे मुंबई महानगरपालिका बघत असते या कचऱ्यांचे व्यवस्थापनासाठी विशेष अशी व्यवस्था देखील महापालिकेने केलेली आहे महापालिका क्षेत्रात जमा होणाऱ्या कचरा तसेच शहरातील मानवी वस्ती आणि उद्योगसमूहातील कचरा याचे देखील मोठ्या प्रमाणात विल्हेवाट दर दिवशी या डंपिंग ग्राउंड मध्ये लावली जाते .
कांजूरमार्गे येथील कचऱ्याच्या या भूमीमुळे होणाऱ्या त्रासामुळे नागरिक हे प्रचंड त्रस्त आहेत तसेच या नागरिकांनी देखील या कचरा भूमी विषयी वारंवार तक्रारी देखील केलेले आहेत याच्या विल्हेवाटीच्या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात धूळ ही पसरते तसेच धुराने देखील त्रास हा नागरिकांना होतो घरामध्ये असणारे वृद्ध तसेच बालक यांच्या देखील आरोग्यावर यामुळे परिणाम होत असल्याने वारंवार तक्रारी देखील नागरिकांनी या संदर्भात केलेले आहेत त्यामुळे वनशक्ती संस्थेच्या या आव्हानामुळे निश्चितच या संपूर्ण प्रक्रियेला वेग मिळणार असल्याचे दिसून येत आहेत. या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय व्हावा व हा प्रश्न मार्गी लागावा अशी स्थानिक रहिवाशांची मागणी आहे
कांजूरमार्ग संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित
मे महिन्यात झालेल्या सुनावणी मध्ये हे क्षेत्र वन संरक्षित असल्याचे घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे यावर लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी असे यावेळी स्थानिक रहिवाशी म्हणत आहेत तसेच महापालिकेने या कचराचे व्यवस्थापनाविषयी दुसरी व्यवस्था करावी शहरात असलेल्या सध्याला देवनार आणि कांजूरमार्ग या दोनच कचऱ्याचे व्यवस्थापन करणारे प्रकल्प आहेत बोरिवली आणि मुलुंड येथील कचरा भूमी बंद करण्याचे निर्देशा अगोदरच देण्यात आलेले आहेत त्यामुळे या कचरा भूमी देखील बंद झालेले आहेत त्यातच आता कांजुर मार्ग देखील बंद करण्याचा आदेश न्यायालयाने दिल्याने महानगरपालिकेकडे सध्याला कचऱ्याच्या व्यवस्थापना संदर्भात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे निश्चितच या संपूर्ण प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी महापालिका सध्याला प्रयत्न करत आहे महानगरपालिकेने देखील या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालून हे प्रकरण लवकरात लवकर कसे दिसणार आता येईल या संबंधित उपाययोजना सध्याला करत आहेत.