घरटनपाडा परिसरात कचऱ्यात आढळले पिस्तूल या संपूर्ण प्रकारांना मुळे दहिसर परिसरात एकच खळबळ उडालेली आहे लहान मुले खेळत असताना कचऱ्यामध्ये त्यांना हे पिस्तूल सापडले परिणामी खेळताना या मुलाने हे पिस्तूल खेळण्यातले आहे असे समजून हातात घेतले.
घरटनपाडा परिसरात कचऱ्यात सापडले पिस्तूल

दहिसर पूर्व मधील घरटनपाडा येथील साईकृपा चाळीजवळील परिसरात ही घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली या घटनेमध्ये लहानशा मुलाने कचऱ्यातील पिस्तूल त्याला दिसले व उचलले हे पिस्तूल त्याने कुतूहलापोटी उचलले असता त्यातून गोळी बाहेर पडली सुदैवाने याच्यात कुठलीही जीवित हानी झाली नाही परंतु मानवी वसाहतीच्या आवारामध्ये अशा प्रकारे कचरा पिस्तूल सापडणे ही बाब योग्य नाही असे तिथल्या स्थानिक रहिवाशांनी यावेळी व्यक्त केले.
या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच घरटनपाडा परिसरात पोलिसांनी कारवाई केली तसेच दहशतवाद विरोधी कक्षाच्या अधिकारी देखील यावेळी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सर्व प्रकरणाचे दखल घेतली या प्रकरणाचा पंचनामा केला या प्रकरणातील सापडलेले हे पिस्तूल कचऱ्यामध्ये असे सहजच पडलेले होते हे पिस्तूल इटालियन बनावटीचे असून त्यात चार काडतुसे होते व त्याचे सर्वसाधारण किंमतही दीड लाख इतकी होती असे यावेळी चौकशीतून समोर आलेचार काडतुसे आणि भरलेली हे पिस्तूल कचऱ्यामध्ये तसेच पडलेले होते.
या संपूर्ण घटनेवेळी घरटनपाडा परिसरातील मुलीही त्यावेळेस त्या भागात खेळत होती खेळता खेळता त्या लहानशा मुलाला कचऱ्यात हे पिस्तूल दिसले ही पिस्तूल खेळण्यातलीच आहे असे त्याला वाटले व त्याने हे पिस्तूल हातात घेतले व सहज म्हणून या शस्त्राचा चाप ओढला परिणामी यातून गोळी बाहेर पडली याचा आवाज हा इतका मोठा होता त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली या आवाजामुळे घटनास्थळी तात्काळ परिसरातील लोकही जमा झाली व संबंधित प्रकरणाची पोलिसांना त्याच क्षणी माहिती देण्यात आली ज्या मुलाला खेळता वेळी हे पिस्तूल सापडले तो अवघ्या बारा वर्षांचा आहे त्यामुळे इतक्या लहान वर्षाच्या मुलाच्या हाती हे शस्त्र सापडल्याने खळबळ उडाली.
शहराच्या मध्यवर्ती असलेले परिसरात अशा प्रकारे पिस्तूल सापडणे हे पिस्तूल लहान मुलांच्या हाती लागणे ही बाब चिंतेची आहे असे तिथल्या स्थानिकांनी व्यक्त केले सुदैवाने या प्रकरणात कुठलीही जीवित हानी ही झालेली नाही त्या परिसरातील स्थानिक रहिवाशांनी योग्य वेळी या मुलाकडून हे पिस्तूल काढून घेतले पिस्तूल येथील सापडल्या ठीकाणी हा मुलगा घाबरला परिणामी या मुलाने हे पिस्तूल तेथेच सोडले दहिसर मधील घरटनपाडा हा परिसर खरंतर दाट लोकवस्तीचा आहे त्यामुळे या परिसरात अशी घटना घडली योग्य नाही इटालियन बनावटीचे असणारे हे पीस्टुल साधारणता दीड लाख इतक्या महागड्या किमतीची आहे त्यात तीन ते चार इतकी काडतुसे देखील होते त्यामुळे निश्चितच इतक्या प्रमाणात भरलेले पिस्तूल हे सहजच सापडणे हे आश्चर्यकारक मानले जात आहे सध्याला शहरात मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या वर जप्तीची कारवाई केली जात आहेत मोठ्या प्रमाणात अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्या लोकांवर देखील कठोर कारवाई ही सध्याला केली जात आहे शहरातील वाढते गुन्हेगारी टाळण्यासाठी देखील प्रशासन मोठ्या प्रमाणावर पावले उचलत आहेत पोलिसांनी देखील ठिकठिकाणी छापे मारत संबंधित चौकशा देखील केलेल्या आहेत.
संबंधित आज्ञाती आरोपी विरोधात भारतीय न्याय साहित्याच्या कलम तीन आणि कलम 25 या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच हे पिस्तूल या कचऱ्याच्या पेटीत कोणी टाकले या संबंधी चौकशीत देखील सध्याला शहरातील पोलीस हे करत आहेत खरंतर अशा प्रकारे अतिशय गैरजबाबदार पद्धतीने हे पिस्तूल एखाद्या कचऱ्याच्या डब्यात टाकणे हे खूप गंभीर बाब आहे त्यामुळे या प्रकरणातील आरोपीला कठरात कठोर कारवाई करण्यात यावी असे वेळी स्थानिकांनी व्यक्त केले मागच्याच काही दिवसांमध्ये पोलिसांनी शहरात अवैधरित्या पिस्तूल बाळगणाऱ्या काही लोकांना देखील अटक केलेली होती या डोळ्या या आंतरराष्ट्रीय टोळ्या असल्याचा संसदेखील पोलिसांनी यावेळी व्यक्त केला होता शहरात घडलेली ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी संध्याकाळी त्या सुमारास ही घटना घडली त्यामुळे देखील हे प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावण्याची विशेष कारवाई सध्याला पोलीस प्रशासन करत आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली या घटनेतील अज्ञात आरोपीला लवकरात लवकर अटक देखील करून त्यावर कारवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या प्रकरणाची माहिती मिळताच तिथले स्थानिक पोलीस तसेच दहशतवादी विरोधी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगटीकरण शाखा हे त्या स्थळी दाखल झाले.